Jalgaon Rain Update: ऑगस्ट शतकातील सर्वात कोरडा महिना! जिल्ह्यात 92 टक्के पाऊस, 8 टक्क्यांची तूट

Rain Update
Rain Updateesakal

Jalgaon Rain Update : जिल्ह्यात यंदाच्या मान्सूनमध्ये ९२.२ पाउस पडला आहे. सरासरीच्या ८ टक्के पावसाची तुट आहे. सरासरी ६३२ मिलीमिटर पाउस पडणे अपेक्षीत होते. ५६७.२ मिलीमिटर पाउस झाला आहे.

‘अलनिनो’च्या प्रभावामुळे यंदा पावसाळा उशिरा सुरू झाला. मुंबई, पुणे येथून मान्सून माघारी परतला असला, तरी खानदेशातून अद्याप तो परतला नाही, असे हवामान अभ्यासक सांगतात. यंदाचा ऑगस्ट महिना हा गेल्या दशकातील सर्वांधिक कोरडा महिला राहिला आहे. (August driest month of century 92 percent rainfall in district 8 percent deficit jalgaon)

नैऋत्य मोसमी मान्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबर या कालावधीत देशातील एकूण कृषी क्षेत्राच्या सरासरी १०१ टक्के पाऊस झाला. सर्वसाधारणपणे या कालावधीत ९४ ते १०६ टक्के पाऊस अपेक्षित असतो.

भारतात एकूण ८६८.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भारतात सरासरी ९६ टक्के पाऊस असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्यानंतर यंदा पावसाची चार टक्के तुट असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले.

यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान देशभरातील पाऊस हा सरासरी ९४ टक्के होता. हा पाऊस २०१८ नंतरचा सर्वात कमी असून, अल निनोच्या प्रभावामुळे व हिंदी महासागरातील सक्रिय ध्रुवीतेमुळे भारतातील मान्सून हंगामात पावसाची तूट आहे.

यामध्ये जून (९१ टक्के) आणि ऑगस्ट (६४ टक्के) महिन्यातील पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहिला. ऑगस्ट महिना तर शतकातील सर्वात कोरडा महिना ठरला.

यंदा नैऋत्य मोसमी पावसाने बंगालच्या उपसागरात पश्‍चिमी वाऱ्यांसह हजेरी लावली. ३० मेस अंदमान-निकोबार बेटांवर सुरू झालेला मान्सून केरळात ८ जूनला दाखल झाला.

त्यानंतर अरबी समुद्र, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, गोवा, कोकणमधील बहुतांश भागात १९ जूनपर्यंत पाऊस दाखल झाला. ८ जुलैपर्यंत नैऋत्य मौसमी पाऊस देशभरात सुरू झाला होता.

महाराष्ट्रात जुलैचे दहा ते पंधरा दिवस पाऊस झाल्यानंतर पावसाचा जोर ओसरला व तब्बल दीड महिना पावसाचा खंड झाला. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या चक्राकार वाऱ्यांमुळे देशात पुन्हा एकदा नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाला.

जिल्ह्यात ६ सप्टेंबरपर्यंत पाउस होता. नंतर पाउस थांबला आहे. १० आक्टोंबरपर्यंत ‘आक्टोबर हिट’चा तडाखा राहील.

नंतर मात्र पून्हा पाउस जळगाव जिल्ह्यात सक्रीय होवू शकतो. ‘अलनिनो’च्या प्रभावामुळे एप्रिलमध्ये पाउस झाला होता. तर सात जूनला पडणारा मान्सून तब्बल २६ जूनला बरसला होता.

Rain Update
Rain Update: पावसाचा जोर ओसरणार, या तारखेपासून हवामान कोरडे; हवामान विभागाचा अंदाज

तालुकानिहाय पडलेला पाउस असा

तालुका टक्केवारी

जळगाव ७६

भुसावळ ९१

यावल ९६.२

रावेर ११५.१

मुक्ताईनगर १२२.५

अमळनेर ७७.५

चोपडा ७५.८

एरंडोल ९७.१

पारोळा १२०.२

चाळीसगाव ७१.५

जामनेर ९२.७

पाचोरा ९६.०

भडगाव ९२.४

धरणगाव ७७.४

बोदवड ९२.९

एकूण ९२.

Rain Update
Rain Update : राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com