
सामाजिक कार्यासाठी KBCNMUतर्फे यंदा पुरस्कार
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे (KBCNMU) यावर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
५१ हजार रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ९ जुलै, २०२२ पर्यंत विद्यापीठाने या पुरस्कारासाठीचे प्रस्ताव मागविलेले आहेत. सामाजिक क्षेत्रात रचनात्मक आणि समाजबांधणी करणारे कार्य आवश्यक असून वैज्ञानिक दृष्टिकोन व सामाजिक प्रबोधन वाढीस लागणारे कार्य असावे, सामाजिक क्षेत्रात केलेले हे कार्य समाजासाठी उन्नत करणारे व पथदर्शक असावे. पुरस्कारासाठीचे वय हे ४० वर्षांपेक्षा कमी नसावे. तसेच १५ वर्षांपेक्षा जास्त काळ त्याक्षेत्रात त्या व्यक्तीचे काम असावे. संस्था असेल तर नोंदणीकृत संस्थेचे काम १५ वर्षांपेक्षा अधिक असावे. संस्थेचा तीन वर्षाचा ऑडिट रिपोर्ट जोडलेला असावा. असे पुरस्काराच्या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा: मविप्र वरिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश मेरिट फॉर्मची उद्यापर्यंत मुदत
या पुरस्कारासाठी कुलगुरूंच्या संमतीने निवड समिती गठित केली जाईल. विशेष परिस्थितीत प्राप्त प्रस्तावांव्यतिरीक्त इतर योग्य व्यक्ती अथवा संस्थेचा विचार निवड समिती करू शकते. विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना दिला असून सविस्तर नियमावली देखील देण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रांसह ९ जुलैपर्यंत अर्ज सादर करता येतील.
हेही वाचा: नव्या शिक्षण धोरणात छुपा अजेंडा
Web Title: Award This Year By Kbcnmu For Social Work
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..