Jalgaon News: प्रशासकीय मान्यतेसह कार्यादेश 9 दिवसांत 100 टक्के द्यावेत : आयुष प्रसाद

Collector Ayush Prasad speaking at the district annual plan review meeting on Tuesday. Other officers nearby.
Collector Ayush Prasad speaking at the district annual plan review meeting on Tuesday. Other officers nearby.

Jalgaon News: जिल्हा नियोजन निधी प्राप्त होणाऱ्या सर्व यंत्रणांनी २१ डिसेंबरपर्यंत शंभर टक्के प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश द्यावेत. (Ayush Prasad statement 100 percent payment of work order with administrative approval in 9 days jalgaon news)

तसेच २०२४-२५ चा प्रारूप आराखडा २१ डिसेंबरपर्यंत सादर करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी (ता. १२) येथे दिल्या. जिल्हा वार्षिक योजनेतील २०२३-२३ मधील प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश, निधी वितरण कामाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, आदिवासी विकासचे यावल प्रकल्पाधिकारी अरूण पवार, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ मधील सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी घटक कार्यक्रमातील कामांच्या सद्यस्थितीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.‌

Collector Ayush Prasad speaking at the district annual plan review meeting on Tuesday. Other officers nearby.
Amrut Yojana: जळगावकरांना डिसेंबरअखेर मिळणार अमृत योजनेचे पाणी; जुनी लाइन होणार बंद

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

श्री. प्रसाद म्हणाले, की सर्व विभागप्रमुखांनी काम सुरू असलेल्या ठिकाणांना भेटी द्याव्यात. कार्यारंभ आदेश देऊन काम सुरू झाले नसल्यास ठेकेदारांना तत्काळ सूचना देण्यात याव्यात. २६ जानेवारी २०२४ पर्यंत छोट्या स्वरुपातील सर्व कामे पूर्ण करण्यात यावीत. अर्धवट स्वरूपात पूर्ण झालेल्या कामांचे उदघाटन करण्यात येऊ नये.

उपयोजना खर्चात जिल्हा अग्रेसर

जिल्हा नियोजनाच्या २०२३-२४ मध्ये ५०० कोटींच्या प्रशासकीय मान्यता देणारा जळगाव जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. तसेच अनुसूचित जाती उपयोजनेत वितरित निधीत ५०.२९ टक्के खर्च आतापर्यंत झाला असून त्यात जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. आदिवासी उपयोजनेत जिल्ह्यात ४४.४२ टक्के खर्च झाला असून जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्हा वार्षिक योजनेत वितरित निधीशी ४८.५८ टक्के निधी खर्च झाला असून जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

Collector Ayush Prasad speaking at the district annual plan review meeting on Tuesday. Other officers nearby.
Jalgaon News: भाव वधारल्याने लसणाविना भाजीला फोडणी; चंपाषष्ठीमुळे वांग्यांना मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com