Jalgaon News | सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणणार : पू. बाबूसिंगजी महाराज

Babusinghji Maharaj
Babusinghji Maharajesakal

जामनेर (जि. जळगाव) : आठ राज्यात ११ हजार तांड्यावर प्रत्यक्ष संपर्क करून ३ हजार तांड्यावर ख्रिस्ती मिशनरीकडून बंजारा बांधवांचे धर्मांतर झाले आहे. (Babusing Maharaj statement Hindu religion at All India Gor Banjara Labana Naikada Samaj Kumbha godri Jalgaon news)

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

त्या सर्व बांधवांना पुन्हा सनातन हिंदू धर्मात परत आणणार आहोत, असा निर्धार पू. संत बाबूसिंगजी महाराज यांनी आज येथे व्यक्त केला. अखिल भारतीय गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभाच्या गोद्री येथील धर्मसभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते

या कुंभास बुधवारपासून (ता.२५) सुरवात झाली. व्यासपीठावर पोहरागडचे मुख्य गादीपती पू. संत बाबूसिंग महाराज, अ.भा. धर्म जागरण प्रमुख शरद ढोले, पू. महामंडलेश्वर गुरू शरणानंद महाराज, पू. संत गोपाल चैतन्य महाराज, संत सुरेश महाराज, संत देनाभगतजी महाराज, संत यशवंत महाराज, संत जितेंद्रनाथ महाराज, आचार्य साहेबराव शास्त्री, महंत संग्रामसिंग महाराज, संत रायसिंग महाराज आदी संत उपस्थित होते.

हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज जागृत करण्यासाठी व समाजाला दिशा देण्यासाठी कुंभ आयोजित असल्याचे पू. संत बाबूसिंगजी महाराज यांनी सांगितले.

यावेळी मंचावर असलेल्या बालाजी भगवान, गुरुनानक देवजी साहेब, भारत माता आणि संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात झाली.

गोद्री समाज कुंभात धर्मसभेसाठी उपस्थित संत- महंत.
गोद्री समाज कुंभात धर्मसभेसाठी उपस्थित संत- महंत.esakal
Babusinghji Maharaj
Jalgaon news : गोद्री कुंभस्थळी संत- महंतांचे आगमन; हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

पूर्वांचलातील चार राज्यांचे ख्रिस्तीकरण : ढोले

अ.भा. धर्मजागरण चे प्रमुख शरदराव ढोले यांनी मार्गदर्शन करताना देशाचे वैभव पाहून परकीय आक्रमणे झाली. ज्या ग्रीकांनी आक्रमण केले होते ते हिंदू झाले. इस्लामचे आक्रमण वेगळे होते. ते क्रूर होते तलवारीच्या जोरावर लाखो लोकांचे धर्मांतरण त्यांनी केले. इसाई द्वारा छल, कपट आणि सेवेच्या माध्यमातून धर्मांतरण सुरु झाले.

हे धर्मांतरण पूजा पद्धती पुरते मर्यादित न राहता वेगळे राज्य आणि वेगळा देशाच्या मागणीने सुरु झाले. पूर्वांचल मध्ये ७ पैकी ४ राज्यांमध्ये ख्रिस्तीकरण झाले. ११ हजार बंजारा तांड्यापैकी ३ हजार तांड्यांचे धर्मांतरण झाले आहे. बंजारा समाजाचे धर्मांतरण होऊ नये यासाठी तसेच धर्मांतरण थांबविण्यासाठी शेकडो संत येथे आले असल्याचे त्यांनी सांगितले.

संत गोपाळ चैतन्य महाराज यांनी आपल्या आशीर्वचन करताना संत समाज धर्म रक्षणाचे काम करतो. ३ हजार गावात धर्म परिवर्तन झाले आहे म्हणून कुंभाची गरज पडल्याचे ते म्हणाले. संत सुरेश महाराज, पू. महामंडलेश्वर शरणानंद महाराज यांनीही सभेस संबोधित केले.

गोद्री बंजारा समाज कुंभात पारंपरिक वेशात लोकनृत्य सादर करताना महिला.
गोद्री बंजारा समाज कुंभात पारंपरिक वेशात लोकनृत्य सादर करताना महिला.esakal
Babusinghji Maharaj
Jalgaon News |रस्त्यांच्या निकृष्ट कामांची चौकशी करणार : आयुक्त देविदास पवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com