जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा : बच्चू कडू

आपल्या राज्याच्या, शहराच्या व गावाच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे : बच्चू कडू
Bachchu Kadu
Bachchu Kaduesakal

यावल (जि. जळगाव) : जाती कारण करणाऱ्यांविरूद्ध आपण सर्वधर्मियांनी एकत्र येऊन देशासाठी आपल्या राज्याच्या, शहराच्या व गावाच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी शुक्रवारी (ता.२७) जाहीर सभेत येथे व्यक्त केले.

ते प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित सुर्दशन चित्र मंदिर चौकातील जाहीर सभेत बोलत होते. त्यापूर्वी येथील जुने भुसावळ नाका परिसरातून बच्चू कडू यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शेकडो कार्यकर्त्यांसोबत शहरातील बोरावल गेट ते बुरुज चौक, चोपडा मार्गे भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

बच्च कडू म्हणाले, की प्रहार जनशक्ती हा सर्वसामान्य व्यक्तीच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या माणसांचा पक्ष असून, यावल नगरपरिषदेच्या साठवण तलावाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात आपण एक बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास प्रहार जनशक्तीचे उतर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या सहपक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते.

Bachchu Kadu
‘मिठाचा खडा’ नव्हे, राजकीय वर्चस्वाचा संघर्षच..!

कार्यक्रमाच्या सुरवातीला श्री. कडू यांच्या हस्ते दारिद्र्यरेषेखालील दिव्यांग व गरजू कुटुंबांना शिधापत्रिका वाटप करण्यात आली. कार्यक्रमास प्रहार जनशक्तीचे धीरज चौधरी, तालुकाध्यक्ष सुभाष सोनवणे, शहराध्यक्ष तुकाराम बारी, यावल नगरपरिषदचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी, दिलीप वाणी, गोलू माळी, माजी नगरसेवक अताउल्ला खान, हाजी हकीम खाटीक, प्रहार अल्पसंख्याक अध्यक्ष हाजी हकीम शेख, नितीन बारी आदी उपस्थित होते. यशस्वितेसाठी अलिम शेख, शेरखान, उमरअली कच्छी, निजाम शेख, जावेद खान, युनूस खन्ना, शकील खान, आसिफ खान, फिरदोस खान, रशीद कुरेशी यांच्यासह प्रहार जनशक्तीच्या सर्व पदधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शकील सईद यांनी सूत्रसंचालन केले.

Bachchu Kadu
'सकाळ' इम्पॅक्ट : महामार्गाला पडलेले तडे भरण्याचे काम सुरु

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com