Bahinabai Mahotsav: बहिणाबाई महोत्सवाचा सोमवारी समारोप; महोत्सवात कोटीची उलाढाल

Bahinabai mohotsav Crowd
Bahinabai mohotsav Crowdesakal

जळगाव : भरारी फाउंडेशनतर्फे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या बहिणाबाई महोत्सवाचा सोमवारी (ता. २३) सायंकाळी समारोप झाला. महोत्सवात बचतगट व लघु उद्योगांची त्यांच्या माल विक्रीतून १ कोटी ३० लाखांची उलाढाल झाल्याचा दावा फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी केला. (Bahinabai Festival concludes 1 crore 30 lakhs turnover of savings groups small enterprises from sale of their goods Jalgaon news)

या वेळी चित्रकला, रांगोळी, मेहंदी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवात सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्यातर्फे उद्योगांना चालना देण्यासाठी विविध उत्पादनांचे स्टॉल, तसेच आंतरराष्ट्रीय तृणधान्ये वर्षानिमित्त कृषी विभागातर्फे उभारण्यात आलेल्या तृणधान्यांबाबत जनजागृती प्रदर्शन विशेष आकर्षण ठरले.

महोत्सवादरम्यान सुमारे एक लाख नागरिकांनी भेटी दिल्या. समारोपप्रसंगी शाहीर विनोद ढगे, सचिन महाजन व सहकाऱ्यांनी ‘जागर लोककलेचा’ या कार्यक्रमाने केला.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Bahinabai mohotsav Crowd
Jalgaon News : शेतकरी नवरा नको गं बाई! ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण

या वेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, उद्योगपती रजनीकांत कोठारी, भालचंद्र पाटील, किशोर ढाके, कुशल गांधी, डॉ. परेश दोशी, राजेश चौधरी आदी उपस्थित होते. समारोप सत्राचे सूत्रसंचलन विनोद ढगे यांनी केले.

Bahinabai mohotsav Crowd
Jalgaon News : वाडे येथील जवानाचा दिल्लीत हृदयविकाराने मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com