Latest Marathi News | शिपाई आत्महत्याप्रकरणी 10 जणांचे जामीन नामंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sucide Case

Jalgaon : शिपाई आत्महत्याप्रकरणी 10 जणांचे जामीन नामंजूर

अमळनेर : शिरूड (ता. अमळनेर) येथील माध्यमिक विद्यालयात कार्यरत शिपायाने संस्थेतील पदाधिकारी व कर्मचारी यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यात ११ जणांविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी दाखल केलेले अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केले तर एकाने अटकपूर्व अर्जाची माघार घेतली होती.

शिरूड येथील व्ही. झेड. पाटील हायस्कूलमधील कार्यरत कर्मचारी तुषार भावराव देवरे हा उच्च न्यायालयाच्या आदेशाने अनुकंपावर शिपाई म्हणून नोकरीस लागला होता. तरीदेखील संस्थेतील काही पदाधिकारी व कर्मचारी यांनी दहा लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील दोन लाख रुपये देऊनही त्यांनी उर्वरित पैशाचा तगादा लावला होता. (Bail denied to 10 people in soldier suicide case Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon : बस अभावी विद्यार्थ्यांची शाळेसाठी पायपीट; बस सुरु करण्याची मागणी

त्यांच्या जाचाला कंटाळून तुषार देवरे याने ११ ऑक्टोबरला रेल्वेत उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून रमेश पाटील, सुनील पाटील, पंजाबराव पाटील, जयंवतराव पाटील, कमलाकर पाटील, दीपक पाटील, शशिकांत पाटील, दिनेश पाटील, सचिन काटे, डॉ. शरद शिंदे, अनिल पाटील या ११ जणांवर आत्महत्येस जबाबदार धरून पत्नीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी सर्वांनी अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केले होते. मात्र न्या. एस. बी. गायधनी यांनी दहा जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केले. तर एकाने अटकपूर्व जमीन अर्जाची माघार घेतली होती. सरकार पक्षातर्फे किशोर बागूल, एस. एस. प्रधान, आर. बी. चौधरी व शशिकांत पाटील यांनी युक्तिवाद केला.

हेही वाचा: Jalgaon : 8 लाखांचा गांजा पकडला; कार खड्ड्यात टाकून चौघे पसार