Jalgaon News : जिल्हा दूध संघाच्या माजी कार्यकारी संचालकांचा जामीन रद्द; संभाजीनगर खंडपीठाचा आदेश

Court Order
Court Orderesakal

Jalgaon News : जळगाव जिल्हा दूध संघातील दूध भुकटी घोटाळ्याप्रकरणी आरोप असलेले माजी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांचा अंतरीम जामीन छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने रद्द केला आहे.

त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. (Bail of ex executive director of district milk union cancelled jalgaon news)

जळगाव जिल्हा दूध संघात झालेल्या दूध भुकटी, बटर घोटाळ्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना अटक करण्यात आली होती. जिल्हा न्यायालयाने त्यांना ४ मेपासून अंतरीम जामीन मंजूर केला होता.

जामिनाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात अपील केले होते. त्यावर शुक्रवारी (ता. २१) न्यायमूर्ती संभाजी मगर, न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्यापुढे सुनावणी झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Court Order
Jalgaon District Collector : जळगाव जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओंची बदली; यांची नियुक्ती..

यात मनोज लिमये यांचा अंतरीम जामीन रद्द करण्याचा आदेश खंडपीठाने दिला.

मात्र, त्यांना याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. सरकारतर्फे ॲड. जी. ओ. वट्टमवार यांनी काम पाहिले, तर लिमये यांच्यातर्फे ॲड. आदित्य सिकची, ॲड. मुकुल कुलकर्णी यांनी काम पाहिले.

Court Order
Jalgaon News : अतिरेकी घुसल्याच्या दूरध्वनीने पळापळ; चाळीसगाव रेल्वेस्थानकावरील थरार...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com