Jalgaon : कत्तलीसाठी नेणाऱ्या गायींची बजरंग दलातर्फे सुटका

Cows crouched in vehicle.
Cows crouched in vehicle. esakal

एरंडोल (जि. जळगाव) : आयशर गाडीस काळ्या रंगाची ताडपत्री बांधून त्यामध्ये क्रूरतेने बांधलेल्या गायी (Cows) व वासरांची बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांनी सुटका केली. पोलिसांनी वाहनातील अकरा गायी, दोन वासरे, आयशर गाडी असा सुमारे पंधरा लाखांचा ऐवज जप्त केला. कत्तलीसाठी (Slaughter) गायी नेणारा ट्रक सापडल्याचे समजताच हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. वाहनातील गायी आणि वासरांना मराठखेडे (ता. पारोळा) येथील समर्पण गो शाळेत रवाना करण्यात आले. (Bajrang Dal rescued cows taken for slaughter Jalgaon crime news)

याबाबत माहिती अशी, की गुरुवारी (ता. ३०) दुपारी तीन वाजेच्या सुमारास काही नागरिकांना आयशर गाडीतून गायी व वासरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती मिळाली. धरणगाव चौफुलीजवळ भरधाव वेगाने आयशर (क्रमांक एमएच २० ईएल ७००३) जात असल्याचे दिसताच नागरिकांनी सदर वाहनास थांबवले. बजरंगदलाचे कार्यकर्ते सागर महाजन हे धरणगाव चौफुली येथून जात असताना त्यांना वाहनाजवळ गर्दी दिसली. त्यांनी त्यांचे सहकारी शंतनू भेलसेकर, कृणाल ठाकूर, विवेक ठाकूर, करण पाटील यांना घटनेची माहिती देऊन बोलावून घेतले. वाहनास काळ्या रंगाची ताडपत्री लावलेली असल्यामुळे त्यांनी वाहनचालकाकडे वाहनात काय आहे, याबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने कार्यकर्त्यांना संशय आला.

Cows crouched in vehicle.
एका नाथाच्या बंडाने दुसऱ्या नाथाच्या स्वप्नांवर फिरले पाणी

कार्यकर्त्यांनी ताडपत्री फाडून वाहनाच्या मागच्या बाजूने पाहिले असता त्यामध्ये गुरे क्रूरपणे बांधल्याचे आढळून आले. वाहनात अकरा गायी आणि तीन वासरे दोराने अत्यंत दाटीवाटीने बांधण्यात आले होते. वाहन चालकाकडे गुरे वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याकडे कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. याबाबत सागर महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाहनचालक गणेश कुऱ्हाडे (रा. रांजणगाव, ता. गंगापूर जि. औरंगाबाद) आणि योगेश खंडागळे (रा. तांदळवाडी, ता. गंगापूर) यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून हवलदार संतोष चौधरी तपास करीत आहेत. वाहनातील अकरा गायी आणि तीन वासरांना समर्पण गो शाळेत रवाना करण्यात आले.

Cows crouched in vehicle.
हिंगोणा येक्षील पाणी समस्या कायमची मिटणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com