esakal | केळी फळ बागायतदार युनियनतर्फे वॅगन्स भरायला नकार: तर वँगन भरण्यावरून व्यापाऱ्यांमध्ये रस्सीखेच

बोलून बातमी शोधा

केळी फळ बागायतदार युनियनतर्फे वॅगन्स भरायला नकार: तर वँगन भरण्यावरून व्यापाऱ्यांमध्ये रस्सीखेच}

पद्धतीनुसार अठरा वी पी एन वॅगन्स सर्व शेतकऱ्यांनी आपल्या कुमकी प्रमाणे वाटून घेतल्या तर हा वाद समन्वयातूनच मिटू शकतो.

केळी फळ बागायतदार युनियनतर्फे वॅगन्स भरायला नकार: तर वँगन भरण्यावरून व्यापाऱ्यांमध्ये रस्सीखेच
sakal_logo
By
प्रवीण पाटील

सावदा:उत्तर भारतात केळीला प्रचंड मागणी आहे.रेल्वेच्या केळी वाहतुकीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व वेळेची बचत होत आहे. कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. बर्याच कालावधी नंतर केळी उत्पादक शेतकऱ्यांना संपूर्ण बाजार भाव मिळून दर्जेदार केळीला बाजार भावांपेक्षा रू.200.ते 300रु. पर क्विंटल प्रमाणे जादाचे दर मिळत आहे.केळी उत्पादक शेतकऱ्यांना आता कुठेतरी सुगीचे दिवस यायला सुरुवात झाली होती. परंतु,रेल्वेच्या व्ही.पी.एन. वँगन वरुन व्यापाऱ्यामध्ये झालेल्या रस्सीखेचीत शेतकऱ्यांच्या सावदा फळबागायतीदार युनियन ने व्ही. पी. एन.वँगन भरायला नकार दिला आहे. व्ही.पी.एन.वँगन मागणीवरुन झालेल्या नव्या वादामुळे पुन्हा केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आनंदावर विर्जन पडते की काय अशी साशंकता निर्माण झाली आहे.

आवर्जून वाचा- तक्रारदार महिलेच्या विरोधात अनेक तक्रारी; जळगाव महिला शोषण प्रकरणाला गृहमंत्र्याची 'क्लिन चिट' 
 


सावदा रावेर यावल परिसरात व्यापारी संख्येने जास्त आहेत.तर,प्रत्येक व्यापाऱ्याला रेल्वेची वॅगन पाहिजे आहे (व्यापारी म्हणजे शेतकऱ्यांचे दिल्लीतील प्रतीनिधी) रेल्वेच्या वी पी एन वॅगन्स ची संख्या 18 ही एवढी मोजकीच आहे.त्यामुळे प्रत्येक व्यापाऱ्याला रेल्वे वॅगन उपलब्ध करून देऊ शकत नसल्याने,हा वाद निर्माण झाला आहे.म्हणून,सावदा केळी फळ बागायतदार युनियनने,वी पी एन वॅगन्स न भरता पारंपारिक असलेल्या बीसीन वॅगन भरायला पसंती दिली आहे.

 
पारंपारिक बी सी एन वॅगन्स एका व्यक्तीला किमान 21 एवढा उपलब्ध होतात.तर,वी पी एन वॅगन्स ह्या एका व्यक्तीला एक देखील मिळत असते त्यामुळे फळ बागायतदार युनियन हे एका व्यक्तीच्या नावावर 21 वगन्स रेल्वेकडून घेऊन सावदा परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आपल्या कुमकी प्रमाणे वाटप करून देतात.त्याच पद्धतीनुसार अठरा वी पी एन वॅगन्स सर्व शेतकऱ्यांनी आपल्या कुमकी प्रमाणे वाटून घेतल्या तर हा वाद समन्वयातूनच मिटू शकतो असे जाणकारांचे मत आहे

वी पी एन वॅगन्स बुक करण्यासाठी शंभर जणांची रांग
विपिन वॅगन्स बुक करण्यासाठी जे पहिले 18 शेतकरी सावदा रेल्वे स्टेशन येथील पार्सल कार्यालयामध्ये येतील, त्यांनाच अठरा वॅगन उपलब्ध होतील असे रेल्वेकडून सांगण्यात आले त्यानुसार दोन रोजी, सकाळी तीन वाजेपासून तब्बल शंभर जणांची रांग लागली होती.पण, ज्यावेळेला बुकिंग सुरू झाली त्यावेळी मात्र फक्त सहाच वी पी एन वॅगन बुक झाल्या बाकीची सर्व शेतकरी त्या ठिकाणाहून निघून गेले. वी पी एन वॅगन्स न बुक करताच शेतकरी का निघून गेले याचं कारण मात्र स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे काही लोक यात राजकारण तर करत नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे.

आवश्य वाचा- सोने खरेदी करण्याचा 'गोल्डन चांन्स' ! सोन्याचा आज काय आहे भाव, जाणून घ्या    
 


काय आहे वी पी एन वॅगन्स, बी सी एन वॅगन्स मधला फरक
वी पी एन वॅगन्स म्हणजे ,उच्च श्रेणी पार्सल वाहून नेणारे रेल्वे वाहक या वॅगन ने भाजीपाला नाजुक फळे व किमतीच्या वस्तू ची वाहतुक केली जाते.तर, बी सी एन वॅगन्स द्वारे कडधान्य कांदा , केळी ,बटाटा यासारखी फळे व सिमेंट,रासायनिक खते,कडक व कठीण अशा वस्तूंची वाहतूक केली जात असते. त्यामुळेच रेल्वे जवळ बी सी एन दर्जाच्या वॅगन्स या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे