
केळीला फळाचा दर्जा नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा होत होती.
केळीला आता फळाचा दर्जा
जळगाव : केळी पिकाला फळाचा दर्जा देण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य शासनाच्या फळबाग लागवड योजनेत केळीला फळाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील तरतुदीमध्ये रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत फळ लागवड योजनेत केळी, द्राक्षे, ड्रॅगन फ्रूट, अव्हॅकॅडो आदींचा समावेश केला आहे. विशेष बाब म्हणून या योजनेत यंदा केळीचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आलेला आहे.
या संदर्भात पाटील यांनी गेल्या आठवड्यातच रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांची भेट घेऊन केळीला फळाचा दर्जा देण्याची मागणी केली होती. हा निर्णय जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी क्रांतिकारी आहे. जळगाव जिल्हा केळीचे आगार मानले जात असला तरी केळीला फळाचा दर्जा नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा होत होती. याचा सर्वात मोठा फटका हा फळपीक विम्यात बसत असून यामुळे प्रक्रिया उद्योगात केळी उत्पादकांना विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री पाटील केळीला फळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होते.
फळ लागवड योजनेतील पिके
केळी, द्राक्षे, ड्रॅगन फ्रूट, अव्हॅकॅडो
Web Title: Banana Get Legal Fruit Quality Maharashtra
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..