esakal | उत्तर भारतातून केळीला मागणी वाढली; आणि भाव पोहचले १,४०० वर 
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तर भारतातून केळीला मागणी वाढली; आणि भाव पोहचले १,४०० वर 

महाशिवरात्री असून, उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो. त्या पार्श्‍वभूमीवर उत्तरेतून केळीला मोठी मागणी आहे.

उत्तर भारतातून केळीला मागणी वाढली; आणि भाव पोहचले १,४०० वर 

sakal_logo
By
प्रविण पाटील

सावदा : केळी दरात मागील दोन-तीन दिवसांत चांगली सुधारणा झाली आहे. दर्जेदार केळीला उत्तर भारतातून चांगला उठाव व मागणी आहे. सध्या दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्‍मी‍र येथे केळी पाठविणे सुरू असून, केळीला एक हजार ३०० ते एक हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे. 

आवश्य वाचा- ‘जीएमसी’त पॉझिटिव्ह तर खासगीत ‘निगेटिव्ह’;कोरोना संशयितांच्या जिवाशी खेळ सुरूच ! 
 

सावदा येथून रेल्वेद्वारे प्रत्येक आठवड्याला जवळपास १५ हजार क्विंटल केळी दिल्लीला पाठविली जातात. तर रावेर, मुक्ताईनगर, यावल, जळगाव, चोपडा, भडगाव भागातून सध्या रोज शंभर ट्रक (एक ट्रक १५५ क्विंटल क्षमता) केळीची पाठवणूक उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाना, जम्मू-काश्‍मीर येथे होत आहे. केळीचे दर मागील दोन दिवसांत हजार ते अकराशे रुपये प्रतिक्विंटल होते. मंगळवारी (ता. २) मात्र मागणी वाढल्याने केळीला एक हजार ३०० ते एक हजार ४०० रुपये असा भाव मिळाला. 

महाशिवरीमूळे केळीला मागणी

येत्या ११ मार्चला महाशिवरात्री असून, उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो. त्या पार्श्‍वभूमीवर उत्तरेतून केळीला मोठी मागणी आहे. राज्यातील नांदेड, सोलापूर व आंध्र प्रदेशातही केळी संपल्याने उत्तर भारतातील व्यापाऱ्यांची संपूर्ण मदार आता सावदा परिसरावर आहे. सावदा, रावेर या परिसरात पावसाळ्यात सी. एम. व्ही. व्हायरस आल्याने केळीवर मोठा परिणाम झाला होता. शेतकऱ्यांनी केळी उपटून पुन्हा लागवड केली होती. त्यामुळे या भागात केळीचे उत्पादन कमी झाले आहे. त्यातच मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाली आहे. याशिवाय, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथूनही मागणी सुरू झाली आहे. 

आवश्य वाचा- भारतातील रहस्यमय असा..हाडांचा सांगाड्यांचा रुपकुंड तलाव; संशोधनातून या गोष्टी आल्या समोर
 

बीपीएन रेल्वे वॅगनची मागणी 
सावदा रेल्वेस्थानकातून बीपीएन प्रकारच्या रेल्वे वॅगनची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. रेल्वेकडून मात्र फक्त अठरा वॅगन उपलब्ध केल्या जात आहेत. त्यामुळे या दर्जाच्या वॅगन्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

गेल्या वर्षी कोरोनामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. यंदा मात्र रेल्वेने केळी वाहतुक सुरू आहे. उत्तर भारतात केळीला मोठी मागणी आहे. उत्पादन खर्च पाहता सध्या मिळत असलेल्या भावामुळे आम्ही समधानी असलो तरी आणखी भाववाढीची अपेक्षा आहे. 
-कमलाकर पाटील, केळी उत्पादक शेतकरी, कोचूर, ता. रावेर 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

loading image