Crime News : बँक व्यवस्थापक लूट प्रकरणात 2 गजाआड; सात महिन्यानंतर अटकेतील दरोडेखोरांना कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Court order

Crime News : बँक व्यवस्थापक लूट प्रकरणात 2 गजाआड; सात महिन्यानंतर अटकेतील दरोडेखोरांना कोठडी

जळगाव : बॅग सोड नाहीतर गोळी मारतो.. अशी धमकी देत बचत गट वसुलीचे पैसे घेऊन जाणाऱ्या खासगी बँक व्यवस्थापकाच्या डोक्यावर पिस्तूल रोखत त्याच्या जवळील बॅगेतील रोकड आणि मोबाईल टॅब असा एक लाख १४ हजार ६२९ रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना विटनेर गावाच्या मुख्य रस्त्यावर २२ मार्च) रोजी घडली होती. एमआयडीसी पोलिसांत दाखल या गुन्ह्याचा तब्बल सात महिन्यांनतर उलगडा झाला असून संशयितांना न्यायालयाने मंगळवार (ता.२०) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा: Jalgaon News : त्या शेतकरी दांपत्याला न्यायाची प्रतिक्षा

एमआयडीसी पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे सुनील शेषराव पाढाळे (वय २६, रा. रहिमाबाद ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद ह.मु. हिवरखेडा रोड, जामनेर) हे जामनेर येथील क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड (एनबीएफसी) या बँकेत केंद्र व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. मंगळवार (ता २२) रोजी कर्जाची रक्कम वसुलीसाठी वराडमार्गे लोणवाडी येथे दुचाकी क्रमांक (एमएच २० डीजे १६६०) वरून गेले असता ही घटना घडली होती.

या प्रकरणी सुनील पाढाळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, रतिलाल पवार तपास करीत होते. स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने रविवार (ता. ४) सहा दरोडेखोरांची टोळी पकडली होती. या टोळीने पोलिस कोठडीत असतानाच एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रस्ताअडवून लूटमार केल्याचे कबूल केले होते.

हेही वाचा: Jalgaon Crime News : बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलाच्या वडिलांचा खून

त्या आधारे सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे यांच्यासह पथकाने सुनील मिश्रीलाल जाधव (वय २४, अंजाळे ता. धुळे), आकाश दिलीप पवार (वय २३, लोणवाळी) या दोघांचा जिल्‍हा कारागृहातून ताबा मिळवून संशयीतांना न्यायालयात हजर केले असता २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली. ॲड. निखील कुळकर्णी यांनी सरकारपक्षातर्फे कामकाज पाहिले.

टॅग्स :JalgaonCrime News