चाळीसगावला होणार बारा ज्योर्तिलिंग एकाच ठिकाणी

शिवलिंग आकारातील राजयोग ध्यान व शांती उद्यानाची निर्मिती केली जाणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी भूमिपूजनप्रसंगी सांगितले.
चाळीसगावला होणार बारा ज्योर्तिलिंग एकाच ठिकाणी
SYSTEM

चाळीसगाव (जि. जळगाव) : मानवी जीवनात अध्यात्माचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे चाळीसगाव मतदारसंघात अध्यात्मिक ऊर्जाकेंद्र तयार व्हावीत, यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून शिवलिंग आकारातील राजयोग ध्यान व शांती उद्यानाची निर्मिती केली जाणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी भूमिपूजनप्रसंगी सांगितले. (Latest Marathi News)

चाळीसगाव शहरात करगाव रोड येथील गजाजन हॉस्पिटल समोरील मोकळ्या जागेत ब्रह्माकुमारीज् तथा वर्ल्ड रिन्युअल स्प्रिच्युअल ट्रस्टच्या माध्यमातून शिवलिंग आकारातील राजयोग ध्यान व शांती उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून शिवलिंग आकारातील राजयोग ध्यान व शांती उद्यान साकारणार आहे. या उद्यानाचे भूमिपूजन शुक्रवारी (ता. २२) करण्यात आले.

चाळीसगावला होणार बारा ज्योर्तिलिंग एकाच ठिकाणी
त्याला 'गोळवलकर' म्हणताही येईना; शरद पोंक्षेंचा राहुल गांधींना टोला

दरम्यान, या केंद्राचे बांधकाम, प्रवेशद्वार, संरक्षकभिंत, प्रदक्षिणा मार्ग व उद्यान सुशोभीकरणासाठी जवळपास २० लाख रुपये आमदार निधीतून खर्च होणार आहे. हे केंद्र शिवलिंग आकारात असून, बाहेरून बारा ज्योतिर्लिंग प्रतिमा स्थापित केल्या जातील. त्यामुळे भाविकांना सर्व बारा ज्योतिर्लिंग दर्शन एकाच ठिकाणी होणार आहे. या वेळी ब्रह्माकुमारीज् जळगाव उपक्षेत्र निदेर्शिका राजयोगीनी ब्रह्माकुमारी मीनाक्षीदीदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत भूमिपूजन झाले. तसेच त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तद्नंतर आमदार चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून आणि कुदळ मारण्यात आला. दरम्यान, केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्यांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

चाळीसगावला होणार बारा ज्योर्तिलिंग एकाच ठिकाणी
कोल्हापुर : शिवाजी विद्यापीठातील भव्य अश्वारूढ पुतळा

या वेळी अमळनेर येथील विद्यादीदी, ब्रह्माकुमारी चाळीसगाव संचालिका ब्रह्माकुमारी वंदनादीदी, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, संजय रतनसिंग पाटील, संजय भास्करराव पाटील, भाजप शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नितीन पाटील, सोमसिंग राजपूत, के. आर. पाटील, अमोल नानकर, भास्कर पाटील, कपिल पाटील, राकेश बोरसे, धनराज पाटील, मनोज गोसावी, भूषण पाटील, कां. रा. पाटील गुरुजी, ए. ता. खोडगे, प्रकाश चौधरी, गुलाब चौधरी, रघुनाथ चौधरी, रमेश शिंपी, किशोर भाई, दिलीप कोठावदे, अशोक राजपूत, विवेक चौधरी, संदीप बेदमुथा, जितेंद्र वाघ, दिनेश चौधरी, शिवाजी पाटील, राहुल चौधरी, आबा सोनार, दीपक अमृतकर, अशोक गुंजाळ, श्री. चौधरी, सुभाष येवले, प्रदीप राजपूत यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील ओम शांती परिवाराचे भक्त उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com