जळगाव : चोरट्यांनी बंद घर पाहात साधला डाव; सोन्यासह लांबविली रोकड

चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण 54 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
Theft
Theftesakal

जळगाव : शहरातील निवृत्तीनगरात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण ५४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसात दाखल तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे, निवृत्तीनगरातील अविनाश साळुंखे (वय ५१) शिक्षक आहेत. गुरुवारी (ता. ५) सकाळी ६.३० वाजता घराला कुलूप लावून कुटुंबासह ते बाहेरगावी गेले होते. बंद घर असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि १० हजारांची रोकड असा एकूण ५४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. अविनाश साळुंखे शुक्रवारी (ता. १३) घरी आले तेव्हा घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक महेंद्र पाटील करीत आहे.

Theft
जळगाव : दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ; नागरिकांमध्ये दहशत
Theft
Jalgaon : जुगार अड्ड्यावर राडा; जिंकणाऱ्यावर तिघांचा प्राणघातक हल्ला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com