कारण नसताना विवाहितेला बेदम मारहाण; 7 जणांविरुद्ध गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Domestic-violence

कारण नसताना विवाहितेला बेदम मारहाण; 7 जणांविरुद्ध गुन्हा

बातमीदार : जीवन चव्हाण

चाळीसगाव (जि. जळगाव) : घराबाहेर आलेल्या विवाहितेला कारण नसतांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण (Domestic Violence) केल्याची थरारक घटना तालुक्यातील खडकी बायपासला घडली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Beating married woman to death for no reason Crime filed against 7 persons Jalgaon Crime News)

याबाबत सविस्तर वृत्त , जयश्री सचिन पाटील (वय-२६) रा. खडकी बायपास ता. चाळीसगाव ह्या आपल्या कुटुंबासह वरील ठिकाणी वास्तव्यास आहे. दरम्यान ३ जुलै रोजी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास घराबाहेर भांडणाचा आवाज ऐकू आला. त्यामुळे जयश्री ह्या पाहण्यासाठी घराबाहेर आल्या. तेवढ्यात शेजारी राहणाऱ्या मीनाबाई भीमराव मांडोळे यांनी हिलाच मारा . असे सांगितले. त्यानंतर जयश्री पाटील हिचे केस धरून घरात घेऊन गेले. व लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. त्यात ज्ञानेश्वर मांडोळे यांनी त्याच्या हातातील लोखंडी रॉडने जयश्री हिच्या डोक्यात मारली. तेव्हा त्या जमिनीवर खाली कोसळल्या. स्थानिकांनी मध्यस्थी करून त्यांच्या तावडीतून जयश्री हिला सोडवले. मात्र गळ्यातील सोन्याच्या पोतची नुकसान होऊन जयश्री हिला गंभीर दुखापत झाली. लागलीच पुढील औषध उपाचारासाठी तिला चाळीसगाव येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

हेही वाचा: Crime Alert : रिक्षा-बस प्रवासात लुटणारी महिलांची टोळी सक्रिय

प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस स्थानक गाठून जयश्री पाटील हिने मुरलीधर दौलत मांडोळे, भीमराव दौलत मांडोळे, सतीष दौलत मांडोळे, ज्ञानेश्वर मुरलीधर मांडोळे, मीनाबाई भीमराव मांडोळे, अरुणाबाई सतिष मांडोळे, छायाबाई मुरलीधर मांडोळे, सर्व. रा. खडकी बु. ता. चाळीसगाव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचा: शिवसेनेसाठी मुस्लीम दाम्पत्याचे तुळजाभवानी सह अजमेर दर्ग्याला साकडे

Web Title: Beating Married Woman To Death For No Reason Crime Filed Against 7 Persons Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..