Latest Crime News | 25 लाखांसाठी पत्नीला मारझोड; पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

woman domestic violence  News

25 लाखांसाठी पत्नीला मारझोड; पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल

जळगाव : दुकान घेण्यासाठी माहेरहून २५ लाख रुपये आणावे, यासाठी पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह दहा संशयितांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Beating wife for 25 lakhs case has been filed against husband and in laws jalgaon Latest Crime News)

शहरातील समतानगरातील माहेर आलेल्या रूपाली सुमीत चव्हाण यांचा विवाह मनमाड (ता. नाशिक) येथील सुमीत चव्हाण यांच्याशी झाला आहे. लग्नानंतर त्यांचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. मात्र नंतर पती सुमीत चव्हाण याने रुपाली यांना दुकान घेण्यासाठी माहेरहून २५ लाख रूपये आणावे, अशी मागणी केली.

पैसे दिले नाही म्हणून पतीकडून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. त्यानंतर सासू, सासरे, जेठ, दिर, नणंद यांनी देखील पैशांचा तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. रुपाली चव्हाण यांच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात पती सुमीत रवींद्र चव्हाण, सासरे रवींद्र दगडू चव्हाण, सासू ताराबाई, जेठ विक्की, दीर अक्षय, नणंद वैष्णवी (सर्व रा. मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस नाईक ज्ञानेश्वर पाटील करत आहे.