Latest Marathi News | नाशिक : शहरात 376 मंडळांना पोलिसांकडून परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav Mandals news

नाशिक : शहरात 376 मंडळांना पोलिसांकडून परवानगी

नाशिक : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांनंतर मोठ्या उत्साहात श्री गणेशाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. ‘श्री’च्या आगमनासाठी नाशिककरांची जय्यत तयारी केली असून, बाजारपेठाही सजल्या आहेत. दरम्यान, शहरातील सुमारे ३७६ गणेश मंडळांना शहर पोलिस आयुक्तालयाकडून परवानगी देण्यात आलेली असून, यामध्ये ३९ मौल्यवान गणपती असल्याचे विशेष शाखेच्या वतीने सांगण्यात आले. (376 mandals in city have been given permission by police Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

तब्बल दोन वर्षांनंतर श्री गणेशाचे बुधवारी (ता.३१) वाजतगाजत आगमन होते आहे. श्रींच्या स्वागतासाठी शहरातील सार्वजनिक गणेश मित्र मंडळांनीही जय्यत तयारी केली आहे. मंडळांनी महापालिका आणि शहर पोलिसांकडून रीतसर परवानग्या घेत भव्य मंडप उभारले आहेत. गत दोन वर्षात कोरोनामुळे गणेशोत्सवासह अनेक समारंभावर निर्बंध लादण्यात आलेले होते.

परंतु दोन वर्षांनी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठाही बहरल्या असून, ग्राहकांची रेलचेल वाढली आहे. शहरातील डोंगरे वसतीगृह, ठक्कर डोम यासह शहर व उपनगरांमध्ये ठिकठिकाणी ‘श्रीं’च्या मूर्तींचे स्टॉल्सवर गणेशभक्तांची गर्दी होती. शहरातील मुख्य आकर्षण असलेल्या गणेश मंडळांकडूनही भव्य मंडप उभारण्यात येऊन जय्यत तयारी केली आहे. तर घरगुती गणेशोत्सवासाठी बालगोपाळांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

बाजारपेठा सजल्या

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठाही सजल्या आहेत. ‘श्रीं’च्या आकर्षक सजावटीसाठी देखण्या मखर बाजारात दाखल झाल्या आहेत. याशिवाय रंगीबेरंगी इलेक्ट्रिक दिव्यांच्या माळींनी बाजारपेठा उजळून निघाल्या आहेत. श्रींसमोर सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी आज बाजारपेठांमध्ये भाविकांची मोठ्याप्रमाणात केली गर्दी होती.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : गोदावरी एक्सप्रेसमध्ये 'गोदावरीच्या राजा'ची स्थापना

Web Title: 376 Mandals In City Have Been Given Permission By Police Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..