Jalgaon News : जन्मठेप शिक्षेतून 2 महिलांची खंडपीठाकडून निर्दोष मुक्तता

Bench acquitted 2 women from life imprisonment
Bench acquitted 2 women from life imprisonmentesakal

एरंडोल : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दोन महिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली. अडावद (ता.चोपडा) येथे १९ मे २०१६ ला गणेश खंबायत यांच्या लग्नानिमित्त संगीताचा कार्यक्रम सुरू होता.

या वेळी नाचण्याच्या कारणावरून तुकाराम काशिनाथ खंबायत व त्यांची पत्नी रेखाबाई तुकाराम खंबायत यांच्यात वाद झाला. पती व पत्नी यांच्यातील वाद वाढतच गेल्यामुळे दोन्ही जण भांडतच घरात गेले. त्यावेळी रेखाबाईच्या आई सुशीलाबाई अरुण बर्डे या देखील घरात गेल्या. (Bench acquitted 2 women from life imprisonment jalgaon News)

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

Bench acquitted 2 women from life imprisonment
Jalgaon News : शेतकऱ्यांसाठी रब्बी उत्पादन वाढवा स्‍पर्धा

जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात तिघाही आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले. या प्रकरणात आरोपींतर्फे तक्रारदार हिरालाल खंबायत आणि प्रत्यक्षदर्शी किशोर यांची साक्ष आरोपींना सिद्ध करण्यासाठी पुरेशी नाही. या प्रकरणात निकाल देताना न्यायमूर्ती आर. जी. अवचट आणि न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्या खंडपीठाने आरोपींचे युक्तिवाद मान्य करून या प्रकरणात फिर्यादीची साक्ष आणि फिर्याद यात सुसंगता आढळून येत नाही.

फिर्यादीने पुरवणी जबाब देताना मूळ फिर्यादीत दुरुस्ती करून दोघा महिलांना गोवण्याचा प्रयत्न केला आहे.तसेच कटकारस्थान रचल्याचा कोणताही पुरावा आढळून येत नसल्यामुळे न्यायालयाने मुख्य आरोपी तुकाराम खंबायत यांची शिक्षा कायम ठेवून रेखाबाई खंबायत आणि सुशीलाबाई बर्डे यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. दिपेश पांडे यांनी काम पाहिले.

Bench acquitted 2 women from life imprisonment
Jalgaon News : सुरेशदादा जैन ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com