
जळगाव : उत्पन्न दाखल्यासाठी लाभार्थ्यांची पायपीट
बातमीदार : जीवन चव्हाण
चाळीसगाव (जि. जळगाव) : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना उत्पन्न दाखल्याची (Income Certificate) सक्ती केल्यानंतर दाखला काढण्यासाठी येथील तहसील कार्यालयात झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे. तासंतास ज्येष्ठांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असून एका कागदासाठी तलाठ्यांकडे अनेक फेरफटका मारावे लागत आहे. त्यामुळे लाभार्थी आता हतबल झाले आहे. ही जाचक अट तातडीने रद्द करण्याची मागणी त्यांच्याकडून होत आहे. (Beneficiarys tired to get income Certificate Jalgaon News)
तालुक्याला संजय गांधी निराधार, श्रावणबाळ सेवा व इंदिरा गांधी निराधार योजना आदी वरदान ठरलेल्या आहे. या योजनेच्या विशेष साहाय्य निधीतून हजारो लोकांच्या घरात चुली पेटत आहे. दरम्यान, तालुक्यात एकूण ३१ हजार २०० लाभार्थी वरील योजनांचे लाभ घेत आहे. त्यापैकी संजय गांधी निराधारचे ५ हजार पाचशे, श्रावणबाळ सेवा योजनाचे ८ हजार सातशे व इंदरा गांधी निराधारांचे १७ हजार लाभार्थी आहे. दरम्यान सामान्य न्याय व विशेष सहाय्यक विभाग यांच्याकडील २० ऑगस्ट २०२० रोजीच्या शासननिर्णयानुसार विशेष साहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यावर एप्रिल-जून महिन्यांत २१ हजारांचा उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयातील संगायो शाखेत जमा करण्याची सक्ती करण्यात आली आहे.
तसेच या कालावधीत लाभार्थींनी उत्पन्नाचा दाखला जमा न केल्यास जुलै महिन्यांपासून अर्थसाहाय्य बंद करण्याच्या सूचना परिपत्रकात देण्यात आल्या आहे. त्यानंतर एकवीस हजाराचा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी हजारोच्या संख्येने तहसील कार्यालयात गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, दाखला जमा करण्याची ३० जून शेवटची तारीख आहे. त्यामुळे आपली महिन्याचे पगार बंद होतील म्हणून ग्रामीण भागातील ज्येष्ठ लाभार्थी धास्तावले आहे. व एकेक कागदासाठी त्यांना तलाठी व तहसील कार्यालयाचा अनेकवेळा पायपीट करावी लागत आहे. यामुळे ज्येष्ठ लाभार्थी त्रस्त झाले आहे. तातडीने ही जाचक अट रद्द करण्याची मागणी लाभार्थांमधून केली जात आहे.
हेही वाचा: Jalgaon : एकट्या तरुणाची राहत्या घरात आत्महत्या
"गेल्या दोन दिवसांपासून एका कागदासाठी तलाठ्याकडे चकरा मारत आहे. त्या एका कागदासाठी मला ४० रूपये मोजावे लागले. त्यानंतर सकाळपासून दुपारपर्यंत कागद जमा करण्यासाठी रांगेत उभा आहे. हा नवीन नियम लागू करून शासनाने गोरगरीबांची थट्टाच केली आहे." - गंगाराम लोटन धनगर, लाभार्थी (रा. खडकी, ब्रु. ता. चाळीसगाव)
हेही वाचा: जळगावचे 6 नगरसेवक शिंदे गटात
Web Title: Beneficiarys Tired To Get Income Certificate Jalgaon News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..