Jalgaon : एकट्या तरुणाची राहत्या घरात आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hanged

Jalgaon : एकट्या तरुणाची राहत्या घरात आत्महत्या

जळगाव : आईला जडलेल्या दुर्धर आजारावर पुण्यात उपचार सुरू असून, त्यांच्यासमवेत भाऊ व बहीण आहे. मात्र, घरी एकटा असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. गाढोदा (ता. जळगाव) येथे घडलेल्या घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Suicide of lone youth at his residence Jalgaon Crime News)

गाढोदे येथील वाजंत्री कलावंत जितेंद्र गोपाळ सपकाळे (वय ३५) याने मंगळवारी (ता. २८) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. जितेंद्र आई, पत्नी, भाऊ व वहिनी यांच्यासह राहत होता. त्याच्या आईला दुर्धर आजाराने ग्रासले. आईच्या उपचारासाठी त्याचा भाऊ सिद्धार्थ आणि बहीण विद्या गेल्या महिन्याभरापासून आईसोबत पुण्यातच आहे. तेव्हापासून जितेंद्र घरी एकटाच होता. मंगळवारी दुपारी गल्लीत काही मुलांसोबत जितेंद्र बसला होता. त्यावेळी तो नेहमीसारखा नॉर्मल होता. पण, रात्री त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा: Jalgaon : हॉटेल ट्यूरिस्टबाहेर सशस्त्रटोळ्या भिडल्या

बुधवारी सकाळी गल्लीत खेळणाऱ्या मुलांच्या लक्षात हा प्रकार आला. नागरिकांनी जितेंद्रचा मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस कर्मचारी अनिल फेगडे तपास करीत आहेत. मृत जितेंद्रच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, वहिनी आणि बहीण आहे.

हेही वाचा: काळ्या बाहुलीवर वकील पत्नीच्या नावे अघोरी विधी; गुन्हा दाखल

Web Title: Suicide Of Lone Youth At His Residence Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..