Jalgaon Crime News : 9 लाखांची सोन्याची लगड घेउन बंगाली कारागीर पसार

सराफा व्यापाऱ्याकडून १६२. १३७ ग्रॅम वजनाची सुमारे ९ लाख रुपये किमतीची सोन्याची लगड कारागिराने डाय पाडण्याच्या बहाण्याने घेऊन पोबारा केल्याची घटना बुधवार (ता.१०) जानेवारीला उघडकीस आली.
crime
crimeesakal

Jalgaon Crime News : शहरातील बदाम गल्ली भागातील काजल ज्वेलर्स या सराफा व्यापाऱ्याकडून १६२. १३७ ग्रॅम वजनाची सुमारे ९ लाख रुपये किमतीची सोन्याची लगड कारागिराने डाय पाडण्याच्या बहाण्याने घेऊन पोबारा केल्याची घटना बुधवार (ता.१०) जानेवारीला उघडकीस आली. (Bengali artisans spread out with gold bars worth 9 lakhs jalgaon news)

रतन तारपदा मांझी ( चोक चायपाट ,ता. दिसपूर,जिल्हा मिदनापूर पश्चिम बंगाल) असे संशयिताचे नाव आहे. शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाशीष पंचानंद धारा (वय-३३ खाणाकुल, हुगळी, बदाम गल्ली जुने जळगाव) यांची काजल ज्वेलर्स नावाने सराफी पेढी आहे.

crime
Jalgaon Crime News : पाचोरा येथे भरवस्तीत घरफोडी; दागिने, रोकडसह 15 लाखांचा ऐवज लंपास

विविध व्यावसायिकांचे सोने घेउन विविध दागिन्यांसाठी डाय पाडण्याचा व्यवसाय आहे. धारा यांच्याकडील बंगाली कारागीर रतन मांझी याला डाय पाडण्यासाठी ९ लाखाची १६२. ३७ ग्राम वजनाची सोन्याची लगड दिली असता, तो पसार झाला.

त्याच्या जळगाव येथील राहण्याच्या ठिकाणी त्याचा शोध घेतला गेला. पण तो थेट पश्चिम बंगालला पळून गेल्याचा संशय आहे. सुभाशीष धारा यांच्या तक्रारीवरून शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime
Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; फरारी संशयितास अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com