जळगाव : भरीत पार्ट्यांना यंदा ब्रेक; अतिवृष्टीने वांगी कोपली

Bharit vangi
Bharit vangiesakal
Updated on: 

जळगाव : जळगाव आणि थंडीचा (Winter) महिना म्हणजे भरिताच्या पार्ट्यांचे (Bharit party) समीकरण दरवर्षी ठरलेले असते. जळगाव जिल्ह्यातील असोदा, बामणोद, यावल परिसरात भरताच्या वांग्यांचे उत्पादन अधिक होते. यंदा मात्र झालेल्या अतिवृष्टीने (Heavy rain) भरताच्या वांग्यांचे उत्पादन कमी झाले आहे. परिणामी बाजारात वांग्याची आवक कमी होत आहे. गतवर्षी २० ते २५ रुपये किलोने मिळणारी भरताची वांगी ७० ते ८० रुपये किलोने दिली जात आहे. वांगी स्वस्त असल्याने भरीत पार्ट्यांना जानेवारी, फेब्रुवारीत सुगीचे दिवस असायचे. यंदा मात्र भाववाढीने भरीत पार्ट्यांवर संक्रांत आली आहे.

भरीत पार्ट्यांना यंदा ब्रेक...

दर वर्षी बामणोद येथील वांग्यांना मोठी मागणी असते. ही वांगी पिकविण्याची पद्धत शास्त्रीय असल्याने या वांग्याची चवच न्यारी असते. यामुळे या वांग्यांना केवळ जळगावच नव्हे, तर नाशिक, पुणे, मुंबई येथे मोठी मागणी असते. शेतकरी येथून वांगी पुणे, मुंबईत नेऊन विकतात. यंदा मात्र अतिवृष्टीने वांग्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्याठिकाणी बऱ्यापैकी उत्पादन आहे. त्यात वांग्यात कीड आहे. यामुळे आलेले उत्पादन फेकून द्यावे लागले आहे. याठिकाणी उशिरा पेरणी केली, तेथील वांगी बऱ्यापैकी आहेत. मात्र उत्पादन कमी आणि मागणी अधिक यामुळे वांग्यांचे दर ७० ते ८० रुपये किलो आहेत.
गतवेळी १५ ते २५ रुपये किलोने वांगी असल्याने दर रविवारी पाटर्यां होताना दिसत. यंदा मात्र तसे चित्र नाही. सोबतच कोरोनाच्या (Corona) निर्बंधामुळे गर्दीवरही बंधन आले आहे. स्वस्तात मस्त होणाऱ्या पार्ट्यांना यंदा ब्रेक लागल्याचे चित्र आहे.

Bharit vangi
जळगाव : विलगीकरणाचा कालावधी आता सात दिवसांवर

''अतिवृष्टीने वांगी उत्पादन घटले आहे. वांगी आहेत ती असोदा, बामणोदची नाहीत. जी आहेत ती अल्प आहेत. वांग्याची आवक बाजारात घटली असल्याने दरही वाढले आहेत. भरताच्या पार्ट्यांना काहीअंशी ब्रेक बसला आहे.'' - किशोर चौधरी, वांगी उत्पादक शेतकरी

Bharit vangi
सावधान! गुलाबी थंडीत चोरट्यांचा तडाखा; 2 दिवसांत 3 घरे फोडली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com