BHR Extortion Case : ऑडिटर नियुक्तीसह ठेव पावत्यांची मॅचिंग कायद्याला धरूनच

BHR Extortion Case
BHR Extortion Caseesakal

जळगाव : बीएचआर पतसंस्थेत ठेवी पावत्यांची मॅचिंग राज्य शासन, केंद्रीय यंत्रणेसह उच्च न्यायालयाच्या निकालात नमूद निर्देशानुसारच करण्यात आले आहे. तसे पुरावेही योग्य ठिकाणी सादर केले आहेत, अशी माहिती फॉरेन्सिक ऑडिटर महावीर जैन यांनी दिली.

दरम्यान, ठेवी अपहार प्रकरणातील संशयित सुनील झंवर यांच्या मुलाकडून एक कोटी २० लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात विशेष एसआयटी पथकाने संबंधितांचे जाबजबाब घेतले आहेत.

मूळ फिर्याद आणि जबाबात नमूद बाबी, प्रत्यक्ष साक्षीदारांच्या जबाबाला अनुसरून तपासात तथ्यांची उकल करण्यात येणार असल्याचे एसआयटीतर्फे सांगण्यात आले. (BHR extortion case Matching of deposit receipts with appointment of auditor as per law Information from CA Mahavir Jain Prosecution witnesses completed their statements investigation of crimes will get direction Jalgaon News)

BHR Extortion Case
Nashik Crime News : सिडकोत गुन्हेगारीचा वाढता आलेख! वाढत्या घटनांमुळे नागरिक असुरक्षित

ठेवी कर्जात मोडल्या गेल्या...

बीएचआर संस्थेचे सर्वेसर्वा अंकल ऊर्फ प्रमोद रायसोनी यांच्यासह इतर संचालकांना अटक झाल्यानंतर संस्थेवर अवसायकाची नियुक्ती करण्यात आली. अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या कार्यकाळात ठेव पावत्यांची कर्ज प्रकरणात मॅचिंग करून घेण्याबाबत केंद्रीय रजिस्ट्रार यांच्या १२ जुलै २०१७ चे आदेश, तत्पूर्वी १६ मे २००९ राज्यांच्या सहकार विभागाने पारीत केलेल्या अध्यादेशानुसारच अडचणीतील पतसंस्थातील कर्ज प्रकरणात ठेवींचे मॅचिंग करवून घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.

त्याचप्रमाणे फॉरेन्सिक ऑडिटर शेखर सोनाळकर यांच्याकडून राज्य शासनाने काम काढून घेतल्यानंतर महावीर जैन यांना विचारणा केली होती. तसे, पत्र तत्कालीन पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या अधीनस्त आर्थिक गुन्हे शाखेने दिले होते.

वेळेत फॉरेन्सिक ऑडिट पूर्ण करून त्याचा अहवाल १८ मार्च २०१९ ला पोलिस अधीक्षकांना सादर केला. त्यापोटी शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे त्यांनी फी अदा केली. तो अहवाल पोलिस दलाने नंतर केंद्रीय समितीकडे सादर केल्याचे सर्व पुरावे आणि सत्यप्रती न्यायालयात सादर करण्यात आल्याचे सीए महावीर जैन यांनी सांगितले.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

BHR Extortion Case
Jalgaon News : धुळे -औरंगाबाद बायपासवरील दुभाजक काढण्यासाठी ‘रास्तारोको’

दरम्यान, भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या ठेवी आणि अपहार प्रकरणात दाखल गुन्ह्यात संशयित सुनील झंवर यांचा मुलगा सूरज झंवर यांना अटक झाली होती.

दाखल गुन्ह्यात जामीन मिळविण्यासंदर्भात कायदेशीर मदत करण्यासाठी एक कोटी २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ॲड. प्रवीण चव्हाण, लेखापरीक्षक शेखर सोनाळकर आणि मद्य व्यापारी उदय पवार यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने फिर्यादी, साक्षीदार, अशा सहा जणांचे जबाब नोंदवून घेतले.

फिर्यादी सूरज झंवर, सुनील झंवर, आयुष मणियार, तेजस मोरे, दीपक ठक्कर यांचे जाबजबाब पूर्ण होऊन त्यांच्या जबाबात आढळून आलेल्या तथ्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्‍चित करून तपासाला सुरवात होत असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले.

चौकशीसाठी पथक पुन्हा चाळीसगावला गेले होते. ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून काही दस्तऐवज पुणे येथे पाठविल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यादृष्टीने एका ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये चौकशी करण्यात आली.

BHR Extortion Case
Mumbai News : डोंबिवली मध्ये महानगर गॅसची पाईपलाईन फुटली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com