Jalgaon News : धुळे -औरंगाबाद बायपासवरील दुभाजक काढण्यासाठी ‘रास्तारोको’

Chalisgaon: Professionals of the area along with students protesting on Dhule-Aurangabad bypass
Chalisgaon: Professionals of the area along with students protesting on Dhule-Aurangabad bypassesakal

चाळीसगाव : येथील धुळे- औरंगाबाद बायपासवरील दुभाजक काढून मार्ग मोकळा करावा, या मागणीसाठी येथील विद्यार्थ्यांसह परिसरातील व्यावसायिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे धुळे-औरंगाबाद रस्त्याचे रुंदीकरणाचे (फोर वे) काम सुरू असल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या बी. फार्मसी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह परिसरातील दुकानदारांना दुभाजक अडथळा ठरत आहे. (On Dhule Aurangabad Bypass Agitation of rasta Roko to remove divisors Jalgaon News)

Chalisgaon: Professionals of the area along with students protesting on Dhule-Aurangabad bypass
Jalgaon News : रस्त्यांवर कोटिंगचा लेअर टाका; महामार्ग विभाग मक्तेदारांना कळविणार

बस, कार व दुचाकी वाहने नेता येत नसल्याने हा दुभाजक काढून हा रस्ता मोकळा करावा, यासाठी किसान ज्ञानोदय मंडळाचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांसह आजूबाजूच्या दुकानदारांनी अर्धा तास रास्ता रोको केला. आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

दरम्यान, या संदर्भात डॉ. महाजन यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (धुळे) प्रकल्प संचालक पी. डी. यादव यांच्याशी जानेवारी २०२३ मध्ये पत्रव्यवहार केला म्हणून संबधित कॅलथिनिया इंजिनिअरिंग कंपनीचे अधिकारी त्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले होते.

हेही वाचा: प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Chalisgaon: Professionals of the area along with students protesting on Dhule-Aurangabad bypass
Jalgaon News |भंगार बाजारावर आज हातोडा : आयुक्त डॉ. गायकवाड

त्यामध्ये कंपनीचे कन्सटंट नायडू, सेक्शन इंजिनिअर मनोज पाटील, अभियंता ध्रुवील पटेल आदी मान्यवर होते. बोढरे फाटा ते धुळे बायपास (विराम हॉटेलपर्यंत) या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे आश्‍वासन दिले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य देव, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व दुकानदार उपस्थित होते.

Chalisgaon: Professionals of the area along with students protesting on Dhule-Aurangabad bypass
Nashik News : नाशिककरांना अद्यापही मेट्रो निओची प्रतिक्षाच; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची फाइल हलेना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com