BHR Extortion Case : संशयितांवर अटकेची टांगती तलवार?

BHR Extortion Case
BHR Extortion Caseesakal

जळगाव : बीएचआर ठेव पावती मॅचिंग आणि मालमत्ता विक्री प्रकरणात अटकेतील सुनील झवर यांना मदत करण्यासाठी खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयितांनी जामिनासाठी अर्ज सादर केला आहे.

या अर्जाला अनुसरून तपासाधिकारी संदीप पाटील यांनी लेखी म्हणणे न्यायालयात सादर केले आहे. ॲड. प्रवीण चव्हाण आणि शेखर सोनाळकर यांच्या जामिनावर आता शुक्रवारी (ता.१०) रोजी कामकाज होणार आहे.

बीएचआर ठेवपावती मॅचिंग आणि पतसंस्थेच्या मिळकती खरेदी केल्या प्रकरणात सुनील झंवर त्यांचा मुलगा सूरज अशांना अटक करण्यात आली होती. (BHR Extortion Case scared of arrest on suspects Presenting statements of investigating officers along with government party Hearing on Friday Jalgaon News)

BHR Extortion Case
Nashik Crime News : सिडकोत गुन्हेगारीचा वाढता आलेख! वाढत्या घटनांमुळे नागरिक असुरक्षित

सूरज याचा जामीन मंजूर झाल्यावर तो, वडील सुनील झवर यांच्या जामिनासाठी प्रयत्नशील होता आणि, नेमक्या याच वेळेस विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासाठी चाळीसगाव येथील मद्य व्यावसायिक उदय पवार याने १ कोटी २२ लाख रुपयांची खंडणी घेतल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यावतीने जिल्‍हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे.

तर, फॉरेन्सिक ऑडिटर शेखर सोनाळकर यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन कायम व्हावा यासाठी दाखल अर्जावर न्या. जे.जे. मोहिते यांच्या न्यायालयात कामकाज सुरु आहे. आज मुळ फिर्यादी सूरज झवर यांनी शपथपत्र सादर केले.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

BHR Extortion Case
NMC News : विनयनगरची अतिक्रमित पक्की बांधकामे जमीनदोस्त! 15 पैकी 9 अतिक्रमित बांधकामावर हातोडा

तपासाची माहिती सादर

जिल्‍हा न्यायालयात न्या.जे.जे.मोहिते यांच्या न्यायालयात एसआयटी प्रमुख संदीप पाटील यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले आहे.

त्यानुसार फिर्यादी सूरज झवर, सुनील देवकिनंदन झवर, आयुष मणियार, विशाल पाटील, तेजस मोरे, दीपक ठक्कर अशा सहा जणांचे जबाब, त्याआधारे केलेल्या चौकशीत निष्पन्न झालेले पुरावे, इलेक्ट्रॉनिक्स एव्हीडन्स,संभाषणाची टेप, व्हिडीओ क्लिपींग आणि शास्त्रोक्त पद्धतीने उपलब्ध माहिती न्यायालयात सादर करण्यात आली आहे.

प्रथमदर्शनी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासाला दिशा मिळणार असून त्या करिता आवश्यक बाबी तपास यंत्रणेला संकलित करावयाच्या आहेत. अशा विस्तृत स्वरूपाचे लेखी म्हणणे निरीक्षक संदीप पाटील यांनी सादर केले असून त्या आधारे जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. सुरेंद्र काबरा यांनी न्यायालया समक्ष मांडले. फिर्यादी सूरज झवर यांच्या वतीने ॲड. सागर चित्रे बाजू मांडत आहेत.

BHR Extortion Case
Nashik Crime News : सिडकोत गुन्हेगारीचा वाढता आलेख! वाढत्या घटनांमुळे नागरिक असुरक्षित

जामिनास विरोध

ॲड.प्रवीण चव्हाण, ऑडीटर शेखर सोनाळकर यांच्या वतीने दाखल जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी सरकारपक्ष, फिर्यादी आणि तपासाधिकारी यांच्या वतीने पुराव्यांसह तब्बल १८-२० कारणे मांडण्यात आली आहेत.

सरकारपक्ष व तपासाधिकारी यांनी सादर केलेल्या ‘से’ संदर्भात सखोल अभ्यास करून युक्तिवाद करण्यासाठी व आपल्या पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी व युक्तिवाद करण्यासाठी बचाव पक्षाच्या वकिलांनी वेळ मागून घेतला. न्यायालयाने यासाठी शुक्रवारपर्यंत (ता.१०) वेळ दिला असून शुक्रवारी जामीन अर्जावरील उर्वरित कामकाज होणार आहे.

BHR Extortion Case
Nashik News: सिन्नरची ऐतिहासिक मंदिरे नामशेष होण्याच्या मार्गावर; त्वरित डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com