Nashik News: सिन्नरची ऐतिहासिक मंदिरे नामशेष होण्याच्या मार्गावर; त्वरित डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mukteshwar temple

Nashik News: सिन्नरची ऐतिहासिक मंदिरे नामशेष होण्याच्या मार्गावर; त्वरित डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी

सिन्नर (जि. नाशिक) : पौराणिक, प्राचीन व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सिन्नर शहरासह तालुक्यात विविध देवदेवतांची लहान-मोठी अनेक मंदिरे आहेत. मंदिराचे ऐतिहासिक गाव अशी ओळख असल्याने सिन्नरला प्राचीन काळातही महत्त्व असल्याचे पुराणात आढळते.

त्यातच अनेक ग्रंथांमध्ये सिन्नर शहराचा उल्लेख आढळतो. नाशिक जिल्हा तीर्थक्षेत्र असूनही प्राचीन काळापासून मंदिरे असलेली कित्येक गावे किंवा शहरे तीर्थक्षेत्र झाली व त्या गावांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास झाला.

सिन्नर तालुका हे गाव असे असेल की, ज्या गावात प्राचीन मंदिरांची या गावात अनेक मंदिरे आहेत. तरीही गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा नाही. त्याहीपेक्षा आश्चर्य म्हणजे अनेक जुने मंदिर हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे गाव ऐतिहासिक मंदिरांच्या विकासात मागे पडले आहे. (Sinnars historic temples on verge of extinction Citizens demand immediate repairs Nashik News)

पण काही मंदिरांचे जीर्णोद्धार सिन्नर शहरातील तसेच तालुक्यातील ज्येष्ठ मंडळींनी एकत्र येत नव्या मंदिरात केलेला आहे, तसे त्या मंदिरांचा कारभार त्या व्यक्ती पाहत आहेत, अशी सर्व मंदिरे सुस्थितीत आहेत.

मात्र, अद्यापही अशी काही मंदिरे आहेत जी पूर्णतः दुर्लक्षित आहेत. त्यांची पडझड होत आहे. स्थानिक प्रशासनाने लक्ष न दिल्यास अशी मंदिरे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील हेमाडपंती असलेले मुक्तेश्वर मंदिर, ईशान्येश्वर मंदिर पूर्व भागातील अनेक गावात ऐतिहासिक मंदिरांची पडझड झाली आहे.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

संबंधित विभागाने या मंदिरांची त्वरित डागडुजी करून त्यांचा नावलौकिक करावा, अशी मागणी नागरिक करीत आहे. तसेच या मंदिरांमुळे शहराचे ऐतिहासिक रूप शाबूत राहून अनेक भाविक असे पर्यटक येथे येण्यास तस्सम राहतील.

ऐतिहासिक किंवा तीर्थक्षेत्र दर्जा जर सिन्नर तालुक्याला मिळाला, तर पर्यटनाला चालना मिळून येथे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल व सिन्नर शहराच्या विकासात उद्योगनगरीसोबतच विकासाचा दर्जा वाढेल.