Bhusawal Market Committee Election : प्रशासकाची तडकाफडकी बदली

Jalgaon Market Committee election
Jalgaon Market Committee electionesakal

Jalgaon News : येथील भुसावळ बाजार समितीच्या निवडणुकीसाठी रणरणत्या उन्हात आखाडा तापला असतानाच अचानक बाजार समितीवर नियुक्त प्रशासकांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आल्याने भुसावळातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Bhusawal Market Committee Hasty Transfer of Administrator jalgaon news)

यापूर्वी भुसावळ बाजार समितीवर प्रशासक म्हणून जे. बी. बारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी सहकार अधिकारी डी. व्ही. पाटील यांची नियुक्ती जिल्हा उपनिबंधक संतोष बीडवई यांनी केली आहे. मंगळवारी (ता. २५) सायंकाळी याबाबतचे आदेश निघाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, बुधवारी दुपारी डी. व्ही. पाटील यांनी पदभार स्वीकारला.

भुसावळ बाजार समितीसाठी शुक्रवारी (ता.२८) निवडणूक होत आहे. माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे व माजी आमदार संतोष चौधरी या निवडणुकीत प्रथमच एकत्र आले असून, उभयंतांनी सर्व १८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत तर भाजपचे आमदार संजय सावकारे यांनीदेखील सर्वच जागांवर उमेदवार दिले असून, आगामी निवडणुकांसाठी ही निवडणूक लिटमस टेस्ट ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Jalgaon Market Committee election
Jalgaon Market Committee Election : संचालकपदासाठी आज मतदान

निवडणुकीच्या धामधूमीत बाजार समितीवरील प्रशासक जे. बी. बारी यांना अचानकपणे हटवण्यात आल्यानंतर राजकीय गोटात तर्कवितर्क लढवले जात असून, बारी यांच्या जागी सहकार अधिकारी डी.व्ही. पाटील यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला असून, बुधवारी त्यांनी दुपारी पदभार स्वीकारताच कामाला सुरूवात केली. आदेशानंतर कामास सुरूवात केल्याचे पाटील यांनी सांगितले.

Jalgaon Market Committee election
Market Committee Election : बाजार समितीसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; 7 केंद्रांवर मतदान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com