भुसावळ : जामनेर-पाचोरा हायस्पीड रेल्वे धावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीजे रेल्वेलाईनची पाहणी करताना एडीआरएम रूकमैय्या मीणा सोबत रेल्वेचे अधिकारी

भुसावळ : जामनेर-पाचोरा हायस्पीड रेल्वे धावणार

भुसावळ: मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे एडीआरएम रूकमैय्या मीणा यांनी जामनेर गाठून पाचोरा-जामनेर नॅरो गेज रेल्वे लाइनची पाहणी केली. सध्या हा रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. मात्र, लवकरच नॅरोगेजचे ब्रॉड गेजमध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने एडीआरएम मीणा यांनी पाहणी केली. त्यात सध्याच्या रेल्वे लाइनची स्थिती जाणून घेतली. जामनेर स्थानकावर गेल्यावर एडीआरएम मीणा यांनी जामनेर येथील बुकिंग ऑफिस, रेल्वे स्थानक, रेल्वे ट्रॅक, ब्रिटीशकालीन सन १८९४ला निर्मित पाण्याची टाकी व स्थानकाची पाहणी केली. दरम्यान, पीजे रेल्वे बंद असली तरी तेथे सुरु असलेल्या आरक्षण काउंटरवरील महिला कर्मचाऱ्याचे चांगल्या कामाबद्दल कौतुक केले.

पीजेसाठी २५ कोटींचा खर्च अपेक्षित

भुसावळ रेल्वे मंडळाचे एडीआरएम रुखमैय्या मीणा यांनी जामनेर ते पाचोरा रेल्वे लाईनची पाहणी केली. २२ मार्च २०२० पासून पीजे रेल्वे लाईन बंद करण्यात आली होती. आता तेथील नागरिक तसेच लोकप्रतिनिधी यांनी ही रेल्वे लाईन पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. पीजे रेल्वेलाईन ५६ किलोमीटर असून ७ इंचाचा ट्रॅक आहे. मात्र यात काही अडचणी असून, यामध्ये कोच नादुरुस्त झाले आहेत आणि डिझेल इंजिन सध्या उपलब्ध नाही. तसेच ट्रॅकचीही दुरुस्ती करावी लागणार आहे. यासाठी जवळपास २० ते २५ कोटी रुपये खर्च येऊ शकतो. केवळ वर्षभरासाठी एवढा खर्च रेल्वेला परवडणार नसल्याचे एडीआरएम मीणा यांनी सांगितले.

ब्रॉडगेजसाठी १ हजार कोटींचे इस्टिमेट

पाचोरा-जामनेर ८४ किमी अंतर असलेल्या पीजे नॅरोगेज रेल्वे लाईला ब्रॉडगेज करावे लागणार आहे. ही रेल्वे लाईन ब्रॉडगेज झाल्यानंतर येथून हायस्पीड गाड्या चालवल्या जातील. त्यामुळे जामनेर आणि पाचोरा परिसरातील प्रवासी देशातील कुठल्याही भागात सहजरीत्या प्रवास करू शकतील. या कामास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून, यासाठी १ हजार कोटी रुपयांचे इस्टिमेट येणार आहे. हे इस्टिमेट रेल्वे बोर्ड मुख्यालयात पोहचले आहे. यानंतर याला मंजुरी मिळाल्यास लवकरात लवकर निविदा प्रक्रिया सुरु होऊन काम सुरू होईल, अशी माहिती एडीआरएम यांनी दिली.

Web Title: Bhusawal Pachora Trains High Speed Train Run

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..