भुसावळ-पहूर व नशिराबाद-मलकापूर रस्ते कात टाकणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नितीन गडकरी

भुसावळ-पहूर व नशिराबाद-मलकापूर रस्ते कात टाकणार

भुसावळ : भुसावळ ते पहूर मार्गाचा दर्जा राष्ट्रीय महामार्ग घोषित करून या रस्त्याचे चौपदरीकरण करुन विकास करण्याची मागणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली असून त्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासोबत नशिराबाद - बोदवड - मलकापूर या रस्त्याचेही रुंदीकरण करण्यात यावे, या मागणीला देखील मान्यता मिळालेली आहे. या दोन्ही रस्त्यांमुळे भुसावळसह परिसरातील तालुक्यांची कनेक्टिव्हिटी ही चांगल्या प्रकारे वाढणार असून याला लवकरच मान्यता मिळून कामास प्रारंभ होईल, अशी अपेक्षा आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना जिल्हा दौरा नुकताच पार पडला. याप्रसंगी महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील विविध रस्ते आणि अन्य महत्वाच्या कामांसाठी १४०० कोटींचा निधी मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. याबाबत तत्काळ सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भुसावळ ते जामनेर ते पहूर या सध्या राज्य महामार्ग क्रमांक ४४ असणाऱ्या रस्त्याचा दर्जा राष्ट्रीय महामार्ग करून याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी केली आहे. पहूर हे जळगाव ते औरंगाबाद मार्गावर असून हा राष्ट्रीय महामार्ग आहे. यामुळे भुसावळ ते पहूर हा रस्ता देखील राष्ट्रीय महामार्ग केल्यास चांगली सुविधा होईल.

पर्यटनाला चालना मिळणार

भुसावळहून अजिंठा लेणीला जाणाऱ्या पर्यटकांना हा रस्ता वरदान ठरू शकेल. या रस्त्यामुळे कनेक्टिव्हिटी गतिमान होतानाच परिसरातील रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. जलनित्सारणाची सुविधा आणि मार्गातील सर्व गावांमध्ये उड्डाणपुलांच्या सुविधांसह याच्या बांधकामासाठी लागणाऱ्या ८० कोटी रूपये निधीची मागणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. ना. गडकरी यांच्या सहकार्याने या रस्त्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कपाशी, केळी

वाहतुकीची सुविधा होणार

यासोबत गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद - कुऱ्हा - बोदवड ते जिल्हा हद्द (मलकापूर) राज्य मार्ग २७० या ५५ किलोमीट लांबीपर्यंतच्या रस्त्याचे रूंदीकरण करण्याची मागणी देखील केली आहे. यामुळे जळगाव जिल्हा हा वऱ्हाड भागाशी कनेक्ट होणार आहे. या रस्त्याचा जळगाव, भुसावळ, बोदवड आणि मलकापूर या चारही तालुक्यातील जनतेला होणार आहे. विशेष करून कपाशी आणि केळीच्या वाहतुकीला हा रस्ता वरदान ठरणार आहे. या मार्गाची जलनित्सारणाच्या सुविधांसह उभारणी करण्यासाठी १७१ कोटी रूपयांच्या निधीची मागणी करण्यात आलेली आहे. हे दोन्ही रस्ते जळगाव जिल्ह्यातील जनतेसाठी लाभदायक ठरणार असल्याने याच्या मंजुरीची आता जिल्हावासियांना उत्सुकता लागलेली आहे.

Web Title: Bhusawal Pahur Nasirabad Malkapur Roads Paved

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top