BJP District President News : भाजप जिल्हाध्यक्ष निवडीला मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुहूर्त

BJP News
BJP Newsesakal

Jalgaon News : भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्ह्यासह राज्यातील २७ जिल्ह्यांच्या अध्यक्ष बदलाच्या प्रक्रियेला आता राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरच मुहूर्त लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय जनता पक्षाने राज्यातील जिल्हाध्यक्ष, जिल्हा महानगराध्यक्ष बदलाची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रदेश स्तरावरून निरीक्षक नियुक्त केले होते. (BJP district president election time after cabinet expansion Coordinating with state level district leaders Jalgaon News)

त्यानुसार या निरीक्षकांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन कार्यकर्ते, पदाधिकारी व आमदार, खासदार यांच्याशी चर्चा करून निवडीबाबत चाचपणीही केली होती. राज्यातील एकूण २७ जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षपदाची निवड केली जात आहे.

भाजपने प्रथमच मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून त्याठिकाणी दोन ग्रामीण व एक शहरी, असे तीन जिल्हाध्यक्ष निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चाचपणीही करण्यात आली होती. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मुंबई दौऱ्यात शनिवारी (ता. २०) ही निवड जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र, ती निवड जाहीर करण्यात आलेली नाही. ती पुढे ढकलण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

BJP News
Jalgaon Crime News : विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. त्यामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षांची निवड पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया करून नावे जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्ह्याशी संबधित नेत्यांशी चर्चा

जिल्हाध्यक्ष निवडीचा निर्णय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हेच घेणार आहेत. मात्र, निवड करताना ज्या जिल्ह्याशी संबंधित राज्य स्तरावरील नेते आहेत. त्यांच्याशी समन्वय करून निर्णय घेण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निवड करताना राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून नावे निश्‍चित करण्यात येतील. जळगाव जिल्ह्यात जळगाव व रावेर, असे दोन ग्रामीण जिल्हाध्यक्ष, तर जळगाव शहरासाठी स्वतंत्र जिल्हा महानगराध्यक्ष असणार आहे.

BJP News
Jalgaon News : गिरणा नदीत तरुणाचा बुडून मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com