Jalgaon News : मनपा प्रभाग समिती सभापतिपदी तीन जागांवर भाजप; एका जागेवर शिंदे गट

Bjp and shivsena
Bjp and shivsenaesakal

Jalgaon News : महापालिकेच्या प्रभाग समितीपदाच्या निवडणुकीत तीन जागांवर भाजप, तर एका जागेवर शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार विजयी झाला. प्रभाग दोनमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला. (BJP on 3 seats and Shinde group on 1 seat for chairmanship of Municipal Ward Committee jalgaon news)

महापालिका प्रभाग समितीपदाच्या निवडीसाठी पीठासीन अध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. व्यासपीठावर आयुक्त विद्या गायकवाड, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.

प्रारंभी प्रभागनिहाय सभापतिपदाची निवड करण्यात आली. माघार घेण्यास पंधरा मिनिटांची मुदत देण्यात आली. ज्या प्रभागात माघार घेण्यात आली त्या प्रभागाच्या सभापतिपदाची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Bjp and shivsena
Gulabrao Patil : बाळासाहेब वैयक्तिक प्रॉपर्टी नाही, देशाची प्रॉपर्टी : पालकमंत्री पाटील

निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून दोन, तर भाजपकडून चार व एमआयएमकडून एक अर्ज दाखल करण्यात आला होता. प्रभाग समिती एकच्या सभापतिपदासाठी भाजपच्या उमेदवाराने भरलेला अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिंदे गटातील नवनाथ दारकुंडे यांची बिनविरोध निवड झाली. प्रभाग समिती दोनमध्ये शिंदे गटाच्या उमेदवार रेश्मा काळे यांचा पराभव करून भाजपचे रंजना सपकाळे विजयी झाल्या आहेत.

तसेच प्रभाग क्रमांक तीनमध्ये एमआयएमच्या नगरसेविका यांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे उमेदवार अंजनाबाई सोनवणे यांचा विजय झाला आहे, तर प्रभाग समिती क्रमांक चारमध्ये भाजपतर्फे एकमेव अर्ज आल्यामुळे विजय पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. विजयी उमेदवारांचे पीठासीन अध्यक्ष पंकज आशिया यांनी अभिनंदन केले.

Bjp and shivsena
Gulabrao Patil : शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी पाळधी येथे उभारणार उपबाजार : पालकमंत्री पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com