MP Unmesh Patil : खासदारांच्या गावी भाजपाचा डंका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Unmesh Patil

MP Unmesh Patil : खासदारांच्या गावी भाजपाचा डंका

चाळीसगाव : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या व जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांचे मूळ गाव असलेल्या दरेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते गिरीश पाटील यांचा दणदणीत विजय झाल्याने दरेगाव ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

हेही वाचा: Jalgaon Road Condition : जळगावातील रस्त्यांच विषयच वेगळा! विधानपरिषदेत गाजतोय मुद्दा

चाळीसगाव तालुक्यात सुमारे १६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. दोन बिनविरोध झाल्याने १४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. आज झालेल्या मतमोजणीत तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींवर भाजपचे लोकनियुक्त सरपंच निवडून आल्याने पुन्हा एकदा चाळीसगाव तालुका हा भाजपचा बालेकिल्ला ठरला आहे.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

खासदारांच्या गावी भाजपाचा डंका

खासदार उन्मेश पाटील यांचे मुळगाव दरेगाव (ता. चाळीसगाव) या ग्रामपंचायतीवर भाजपचे गिरीश पाटील यांनी राजेंद्र साबळे यांचा एकतर्फी पराभव करीत ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविला आहे. वैशाली राठोड, बबन गायकवाड, जगदीश पाटील, रत्‍नाबाई पाटील हे भाजपचे कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्यपदी बहुमताने निवडून आले असून, या अगोदर प्रकाश शिरसाठ व दुर्गाबाई माळी या बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आले आहे. त्यामुळे बहुमताने दरेगाव ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

हेही वाचा: Road Construction: पाच मिनिटात बुजविता येईल रस्त्यावरील खड्डा!