Jalgaon Road Condition : जळगावातील रस्त्यांच विषयच वेगळा! विधानपरिषदेत गाजतोय मुद्दा

Jalgaon Road Condition
Jalgaon Road Conditionesakal

जळगाव : शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा विषय बुधवारी (ता. २१) थेट हिवाळी अधिवेशनात गाजला. माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिक गेल्या काही वर्षांपासून प्रचंड त्रास सहन करीत असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही कामे होत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले.

Jalgaon Road Condition
Eknath Khadse यांची मुख्यमंत्री Eknath Shinde अनोख्या शैलीतून टीका

जळगाव शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत श्री. खडसे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. रस्त्यांसाठी गेल्या तीन वर्षांत किती निधी मंजूर करण्यात आला व किती खर्च करण्यात आला, तसेच जळगाव शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली, याबाबत विचारणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावात सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत १०० कोटींच्या प्रस्तावास तत्वतः मान्यता दिली आहे.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

पैकी २२ मार्च २०२२ अन्वये शहरातील ४९ रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी ३९ कोटी रकमेस मान्यता देण्यात आली आहे. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. यापैकी शासनाकडून ८.९३ कोटी व महापालिका हिश्यातील ५.१० कोटी सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करण्यात आले आहेत.

ज्या रस्त्यावरील पाणीपुरवठा व मल्लनिसरण योजनेंतर्गत कामे पूर्ण झाली आहेत, त्या रस्त्यांची पुनर्बांधणीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात आली आहेत, असे सांगितले.

पुरनाड नाक्यावरील गैरप्रकार

मध्य प्रदेशच्या सीमेवर पुरनाड नाक्यावर परिवहन विभागाचे अधिकारी ट्रकचालकांकडून लाच स्वीकारतात, तसेच वजन मापात फेरफार करून ट्रकचालकांकडून अवैध मार्गाने पैसे गोळा करतात. या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्यात आली, याबाबत श्री. खडसे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर देताना यासंदर्भात चौकशी करून वजनकाट्यांचे कॅलिब्रेशन करून घेण्याबाबत आदेश दिल्याचे सांगितले.

Jalgaon Road Condition
Devendra Fadnavis: त्यांचे लग्न, मुलगी झाली...खडसेंनी फडणवीसांना करुन दिली 'त्या' भीष्म प्रतिज्ञेची आठवण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com