Eknath Khadse
Eknath Khadseesakal

Jalgaon News : मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यावर खडसे ठाम; राष्ट्रवादी काँग्रेसचे आज आंदोलन

Jalgaon News : राज्यात कापूस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, त्यावर सरकारने कोणताही तोडगा काढलेला नाही.

जिल्ह्यातील मंजूर प्रकल्प अन्यत्र पळविले जाणे, भीषण टंचाई, बिघडलेली कायदा-सुव्यवस्था या सर्व प्रश्‍नांवर कोणतेही ठोस आश्‍वासन न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांना मंगळवारी (ता. २७) काळे झेंडे दाखविण्यावर आमदार एकनाथ खडसे ठाम आहेत.

कापसाला भाव नसल्याने निम्म्याहून अधिक कापूस आजही शेतकऱ्यांच्या घरात आहे. कांदा उत्पादक मेटाकुटीस आला आहे. जिल्ह्यातील प्रकल्प अन्य जिल्ह्यांमध्ये पळवून लावले. कायदा-सुव्यवस्थेसह पाणीटंचाईवर शासन गंभीर नाही.(Black flags for Chief Minister Khadse insisted on showing Today movement of NCP Jalgaon News)

या सर्व प्रश्‍नांबाबत मंगळवारी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती. माजी मंत्री व आमदार एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत हे जाहीर केले होते.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार किशोर पाटील यांनी या विषयावर श्री. खडसे व मुख्मंत्र्यांचे बोलणे करून देण्याचा सोमवारी (ता. २६) प्रयत्न केला.

मुख्यमंत्र्यांचे अधिकारी जळगावात सायंकाळी येऊन श्री. खडसे यांच्याशी यासंदर्भात बोलणार होते. मात्र, या सर्व प्रयत्नांमधून कोणतेही ठोस आश्‍वासन न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यावर आपण ठाम असल्याचे श्री. खडसे यांनी सायंकाळी सांगितले.

या आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुपारी एकला आकाशवाणी चौकातील पक्षाच्या कार्यालयाजवळ जमावे, असे कळविले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Eknath Khadse
Good News : राज्यात दोन टप्प्यात तब्बल 'इतक्या' शिक्षकांची होणार भरती; दीपक केसरकरांची मोठी घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com