
जळगाव : गिरणा नदीपात्रालगत सेल्फी काढताना पाय घसरून पात्रात पडलेल्या तरुणींना वाचविण्यात स्वतःचा जीव गमावणाऱ्या नयन निंबाळकरचा मृतदेह शर्तीच्या प्रयत्नांनंतर आजअखेर आढळून आला. (Body of drwoned death Nayan found Jalgaon Latest Marathi News)
कांताई बांधाऱ्याजवळील नागाई-जोगाई मंदिराजवळील गिरणापात्रात पिकनिकसाठी गेलेल्या दहा ते बारा तरुणांच्या ग्रुपमधील तरुणी फोटो काढण्यासाठी उभ्या असताना हा प्रकार घडला होता. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात नयन स्वत: नदीत बुडाला.
सोमवारी (ता. १२) सकाळी शोधकार्य राबवून नयनचा मृतदेह नदीपात्रातील दगडांच्या कपारीत अडकल्याचे आढळून आले. मृतदेह बाहेर काढण्यात येऊन जिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. मुलाचा मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता.
शहरातील शिवाजी परिसरातील दूध फेडरेशनजवळ मिथिला सोसायटी असून, याठिकाणी राहणारे सुमारे १२ ते १४ तरुण-तरुणी हे सहलीसाठी कांताई बंधाराजवळ असलेल्या नागाई-जोगाई मंदिर परिसरातील गिरणा नदीच्या पात्राजवळ गेले होते. त्या ठिकाणी १२ च्या सुमारास फोटो काढण्यासाठी योगिता दामू पाटील (वय २०), सागर दामू पाटील (वय २४), समीक्षा विपिन शिरोडकर (वय १७), नयन योगेश निंबाळकर (वय १७) हे नदीच्या काठाजवळील पाण्यात उतरले.
पाण्यात फोटो काढत असताना त्यातील एकाचा पाण्यात पाय घसरला आणि तो वाहत जाऊ लागला. ते पाहून त्याच्यासोबत पाण्यात उतरलेल्यांनी त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घतली. मात्र पाण्याची पातळी अचानक वाढल्याने ते वाढत्या प्रवाहासोबत वाहू लागले. वाहत जाणाऱ्या योगिता, सागर आणि समीक्षा यांना पाण्यातून बाहेर काढण्यात त्यांच्या साथीदारांना यश आले. मात्र मित्रांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेल्या नयन निंबाळकर हा पाण्यात वाहून गेला होता.
दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह
रविवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे नयन वाहून गेला होता. दरम्यान, नागाई-जोगाई मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नागझिरी नाल्याजवळील नदीपात्रातील दोन दगडांच्या कपारीत नयचा मृतदेह अडकेल्या अवस्थेत पोलिसांना मिळून आला.
कुटुंबीयांचा आक्रोश
मृतदेह सापडल्यानंतर त्याचे शव विच्छेदन करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. यावेळी नातेवाइकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नयनचा मृतदेह बघताच त्याच्या कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. नयन हा दहावी उत्तीर्ण होऊन अकरावीचे शिक्षण घेत होता. त्याचे वडील दूध फेडरेशनमध्ये नोकरीस आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.