Jalgaon Crime News : कन्नड घाटात आढळला महिलेच्या हाडांचा सांगाडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Jalgaon Crime News : कन्नड घाटात आढळला महिलेच्या हाडांचा सांगाडा

चाळीसगाव (जि. जळगाव) : कन्नड घाटामध्ये बोढरे शिवारात एका महिलेच्‍या मृतदेहाचा हाडाचा सांगाडा (skeleton) आढळून आला. यासंदर्भात वनपाल दीपक किशन जाधव यांनी फिर्याद दिली आहे. (Bone skeleton of woman found in Kannada Ghat jalgaon crime news)

याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कन्नड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या दर्ग्यापासून अंदाजे दोनशे मीटर अंतरावर काटेरी झुडपात एका गोणपाटात मृतदेहाची हाडे आढळून आले. एका अज्ञाताने महिलेचा खून करून मृतदेह आणून फेकल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांनी पंचनामा करीत हाडाचा सांगाडा जप्त केला आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

गोणपाटात भरून विल्हेवाट

गोणपाटात हाडे, केस, कवटी, महिलेची साडी, ब्लाऊज, परकर तसेच बांगड्या असे आढळून आले आहे. पोलिसांच्‍या माहितीनुसार दोन ते तीन महिन्यांपूर्वी महिलेची हत्या करून मृतदेह गोणपाटात भरून विल्हेवाट लावण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव तपास करीत आहेत.

टॅग्स :Jalgaoncrimedeath