जळगाव : बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व परिसरात पावसाचा जोर

मागील आठवड्यापासुन पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाची पाणीपातळी स्थिर होती.
Bori Dam
Bori DamSakal
Updated on: 

जळगाव : काल ता. 27 व ता. 28 रोजी बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व परिसरात पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे 12 दरवाजे 0.20 मीटर ने उघडुन 6900 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत असुन बोरी नदी दुधडी भरुन वाहत आहे. मागील आठवड्यापासुन पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाची पाणीपातळी स्थिर होती. मात्र गेल्या दोन दिवसापासुन पावसाचा पुन्हा जोर वाढल्याने धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने धरणाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने धरणाचे पाणी नदीद्वारे विसर्जित करण्यात येत आहे.

त्यामुळे नदी काठावरिल तामसवाडी, टोळी, तरडी, मोंढाळे, पिंप्री, उंदीरखेडे, विचखेडे, बहादरपुर, भिलाली, बहादरवाडी या परिसरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात येवुन नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडु नये, तसेच नदी प्रवाहातुन कुणी वाहने नेवु नयेत, असा इशारा गिरणा पाटबंधारे विभागाकडुन देण्यात आला आहे.

बदारपुर मंडळातील ग्रामस्थांचा महामार्गाद्वारे प्रवास

बोरी नदी दुथडी वाहत असल्याने शिरसोदे व बहादरपुरला जोडणारा पुलावरुन पाणी वाहत असल्याने बहादरपुर मंडळातील बहादरपुर,शिरसोदे,इंधवे,जिराळी,सुमठाणे येथील ग्रामस्थांना पारोळ्यात येण्यासाठी मोंढाळे प्र अ मार्गाद्वारे महामार्गातुन प्रवास करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com