नियतीने भाऊ गमावला; ‘बळीराजा’ने दिले बळ

Members of the Baliraja family giving fixed deposit receipts of one lakh each to the sisters as a wave.
Members of the Baliraja family giving fixed deposit receipts of one lakh each to the sisters as a wave.esakal

पातोंडा (जि. जळगाव) : आपण समाजाचे देणे लागतो, या उदात्त हेतूने भारावलेले अमळनेर, चोपडा, किनगाव व शिरपूर येथील ३० ते ४० तरूण एकत्र आले व त्यांनी ‘बळीराजा परिवार’ या नावाने सामाजिक कार्य करण्यास साधारण सात ते आठ वर्षांपूर्वी सुरूवात केली.

या परिवाराने नंदगाव (ता. अमळनेर) येथील अपघातात एकुलता एक भाऊ गमावलेल्या रोशनी व शिवानी या दोन्ही बहिणींच्या नावे पोस्टात प्रत्येकी एक लाखाची मुदत ठेव पावती करून रक्षाबंधनानिमित्त अनोखी भेट दिली. (both sisters from Nandgaon 40 youths came together gifted fixed deposit of Rs 1 lakh raksha bandhan 2022 jalgaon news)

नंदगाव येथील हिरालाल पाटील यांना एक मुलगा व दोन मुली. उदरनिर्वाहाकरीता दीड एकर जमिनीत राबणाऱ्या या आई- वडिलांचा एकुलता एक कमावता मुलगा व बळीराजा परीवाराचा सदस्य किरण पाटील (वय २२) याच्यावर काळाने घाला घातला. ३० जून २०२२ रोजी दीड महिन्यांपूर्वी किरणचे अपघातात निधन झाले.

आई वडिलांचा आधार व दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ नियतीने हिरावून नेला. आता ऐन तारुण्यात असलेल्या रोशनी (वय १९) व शिवानी (वय १६) यांच्या भविष्याची चिंता सतावत असतानाच बळीराजा परिवार या कुटुंबाच्या मदतीला धावून आला. एकुलता एक भाऊ गमावलेल्या रोशनी व शिवानीच्या मदतीला बळीराजा परीवाराच्या रूपाने ३० ते ४० भाऊ धावून आले असून, त्यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन्ही बहिणींच्या नावे पोस्टात प्रत्येकी एक लाख रूपयांची तीन वर्षांची मुदत ठेव पावती करून एक अनोखी ओवाळणी देऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

पोस्टातील मुदत ठेवीला आईला वारस लावले आहेत. रोशनी व शिवानीच्या लग्नाची जबाबदारी देखील बळीराजा परीवाराने उचलली असल्याचे परीवाराच्या सदस्यांनी सांगितली. प्रताप रणखांब, प्रदीप कोठावदे, अमर शितोळे, संजय पाटील, दीपक साळुंखे हे बळीराजा परीवारच्या सामाजिक बांधिलकी सोहळा या संकल्पनेचे गुरूवर्य असून, त्यांच्या प्रेरणेच आम्ही हे कार्य पेलतो, अशी भावना परिवारातील सदस्य व्यक्त करतात.

Members of the Baliraja family giving fixed deposit receipts of one lakh each to the sisters as a wave.
नाशिक : पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धाला लुटले

बळीराजा परिवाराचे उपक्रम

दरवर्षी बळीराजा परीवार जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करीत असतो. आतापर्यंत दोन हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे. दरवर्षी पाड्यावरची दिवाळी या उपक्रमांतर्गत आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांना कपडे व फराळाचे वाटप करून आपल्या मुलाबाळांसह पाड्यावरच दिवाळी साजरा करतात.

"एकुलत्या एक भावाच्या निधनाने आम्ही पूर्णत: खचून गेलो होतो. परंतु बळीराजा परिवारातील भाऊ मदतीला धावून आल्याने आमच्या पाठीशी एवढे भाऊ असल्याची खात्री झाली व जगण्याची उमेद नव्याने निर्माण झाली." - रोशनी व शिवानी पाटील, नंदगाव

Members of the Baliraja family giving fixed deposit receipts of one lakh each to the sisters as a wave.
Nashik : ATM फोडण्याचा पांगरी येथे प्रयत्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com