Nashik : ATM फोडण्याचा पांगरी येथे प्रयत्न | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ATM Machine

Nashik : ATM फोडण्याचा पांगरी येथे प्रयत्न

सिन्नर (जि. नाशिक) : पांगरी येथे शिर्डी महामार्गालगत असलेल्या इंडियन ओव्हरसिस बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. चोरट्यांकडून यासाठी सुरूंगाची कांडी वापरण्याचा प्रयत्न झाल्याचे घटनास्थळावरील स्थितीवरून दिसते. तथापि पोलिसांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे. (Attempt to break ATM at Pangri Nashik latest marathi news)

पांगरी ग्रामपंचायत कार्यालयाजवळच इंडियन ओव्हरसिस बँकेची शाखा आहे. तेथेच शेजारी एटीएम आहे. बँकांना सलग सुट्या असल्याने प्रत्येक एटीएममध्ये पुरेशी रक्कम ठेवण्याचे निर्देश रिझर्व्ह बॅंकेकडून देण्यात आल्यामुळे पांगरी येथील या एटीएममध्ये देखील मोठ्या प्रमाणात रोकड मिळेल या अपेक्षेने चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला असावा.

एटीएम उघडण्याचा प्रयत्न अपयशी झाल्यावर चोरट्यांनी थेट सुरुंगाचा स्फोट करण्यासाठी वापरले जाणारे ताईत वापरले. मात्र, मजबूत असलेले एटीएम या स्फोटानेही फुटले नाही. सकाळी एटीएमकडे गेलेल्या लोकांना शटरची मोडतोड झालेल्या अवस्थेत बंद असल्याचे आढळून आल्याने हा प्रकार उघड झाला.

एटीएम रूमच्या दर्शनी दरवाजाच्या काचा फुटल्या होत्या. सिलिंगदेखील खाली आले होते. या ठिकाणी ताईत जोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वायरचे तुकडेही आढळून आले.

हेही वाचा: नाशिक : करवाढीचा निर्णय 12 सप्टेंबरला

घटनेनंतर सहाय्यक निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक विजय सोनवणे, हवालदार सतीश बैरागी यनी पाहणी केली. बँकेच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधण्यात आला. मात्र, ते परगावी होते. सीसीटीव्ही फुटेजची तपासणीनंतरच चोरीबाबत निश्‍चित निष्कर्ष काढता येईल.

फुटेजवरून ठरणार तपासाची दिशा

एटीएम रूममध्ये स्फोटके वापरल्याचा कोणताही प्राथमिक पुरावा नाही. स्फोटक वापरले असते, तर भिंतीवर, मशिनवर किंवा जमिनीवर आघात होऊन खड्डा तयार झाला असता किंवा भिंती काळ्या पडल्या असत्या. मात्र, असा कोणताही प्रकार न घडल्याने एटीएम फोडण्यासाठी स्फोट घडवला गेला असे खात्रीशीर म्हणता येणार नाही असे सहाय्यक निरीक्षक सागर कोते यांनी सांगितले.

हेही वाचा: Nashik : गणेशाच्या विविध रूपांनी सजली बाजारपेठ

Web Title: Attempt To Break Atm At Pangri Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..