लग्नासाठी धमकावत विवाहितेवर अत्याचार; गरजेपुरते ‘हम साथ-साथ’ नंतर ‘हम आपके हैं कौन’

A boy from Jalgaon has abused a married woman by threatening her for marriage
A boy from Jalgaon has abused a married woman by threatening her for marriage
Updated on

जळगाव : महिलेपेक्षा एक-दोन वर्षांनी लहान तरुणाने ‘मला तुझ्यासोबतच लग्न करायचे आहे, नाहीतर मी मरून जाईन,’ अशी धमकी देत चंद्रपूर जिल्ह्यात पळवून नेले. या २२ वर्षीय विवाहितेवर वारंवार अत्याचार करून जळगावी सोडून आकाश जाधव या भामट्याने पळ काढला. शहर पोलिस ठाण्यात अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

शहरातील राजमालतीनगरातील आकाश जाधव (वय २१) या तरुणाचे २२ वर्षीय विवाहितेसोबत प्रेमसंबंध होते. त्या विवाहितेचा पती घरी नसताना आकाश तिच्या घरी जात आणि तिला धमकी देत तिच्यावर अत्याचार करीत असे. आकाश विवाहितेला वारंवार धमकी देत असल्याने ११ नोव्हेंबरला तो विवाहितेला घेऊन बसने नागपूर येथे पोचला. त्यानंतर तेथून चंद्रपूर जिल्ह्यात मांजरी (ता. भद्रावली) येथे घेऊन गेला. तेथेही तिच्यावर सतत अत्याचार करत राहिला. नकार दिल्यास पीडितेला मारहाण करण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. 

अजिंठा चौकात सोडून पसार
 

काही दिवस मांजरी येथे राहिल्यानंतर आकाशने पीडितेला ‘तू तुझ्या घरी जा, मी माझ्या घरी जातो’ असे सांगून २६ ऑक्टोबरला सोबत घेऊन रेल्वेने भुसावळपर्यंत आला. भुसावळातून जळगावपर्यंत बसने आल्यानंतर आकाशने विवाहितेला अजिंठा चौफुलीपर्यंत सोडले आणि तो या ठिकाणाहून पसार झाला. 

पोलिसांत हरविल्याची नोंद
 

पीडिता रिक्षाने टॉवर चौकात आल्यानंतर तिने तिच्या आईला फोन लावला. तिची आई या ठिकाणी आली असता तिने तिच्यासोबत घडलेली संपूर्ण हकिकत आईला सांगितली. दरम्यान, शहर पोलिसांत ती विवाहिता हरविल्याची तक्रार दाखल असल्याने मंगळवारी ती शहर पोलिस ठाण्यात हजर झाली. या ठिकाणी तिने दिलेल्या तक्रारीवरून आकाश जाधव याच्याविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhusawal green hydrogen project
Why were Jalgaon land officials arrested?
Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Marathi News Esakal
www.esakal.com