Latest Marathi News | रागाच्या भरात मुलाने सोडले घर; पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

child

रागाच्या भरात मुलाने सोडले घर; पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल


जळगाव :
शहरातील पिंप्राळा परिसरातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा रागाच्या भरात घरातून निघून गेल्याची घटना घडली. मुलगा घरी परत न आल्याने याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: जनावरांच्या लम्पी आजारावर NDRFच्या निकषानुसार मदत; CM शिंदेंची घोषणा


जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात अल्पवयीन मुलगा सुमीत महेंद्र माळी बुधवारी (ता. ७) सकाळी घरात कुणाला काहीएक न सांगता रागाच्या भरात कुठेतरी निघून गेला. सर्वत्र शोध घेऊनही मुलगा मिळून आला नाही. उशिरापर्यंत घरी परत आला नाही. अखेर याबाबत मुलाचे वडिलांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच ८ सप्टेंबरला नशिराबाद पोलिसांत तक्रार केली. मुलगा अल्पवयीन असल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाले पुढल तपास करीत आहेत.

हेही वाचा: बुडणाऱ्या मुलींना वाचविणारा गेला वाहून; बेपत्ता युवकाचा शोध सुरू

Web Title: Boy Left The House In Anger In Jalgaon Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaon