बुडणाऱ्या मुलींना वाचविणारा गेला वाहून; बेपत्ता युवकाचा शोध सुरू

drowning death latest marathi news
drowning death latest marathi newsesakal

जळगाव : गिरणा नदीपात्रात कांताई बंधाऱ्याजवळ असलेल्या नागाई जोगाई मंदिराजवळील पर्यटनस्थळी आलेल्या शिवाजीनगर दूध फेडरेशनसमोरील मिथिला सोसायटीतील विद्यार्थ्यांतील सेल्फीच्या नादात नदीत पडलेल्या मुलींना वाचविताना वाचविणारा युवक नयन निंबाळकर (वय १७) मात्र वाहून गेला. त्याचा शोध सुरू असून, या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.


मिथिला सोसायटीतील मुलांनी रविवारी (ता. ११) एकत्र येत पिकनिकचा बेत आखला होता. समवयस्क मित्र-मैत्रिणी दर सुटीच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला जात असतात. पालकांच्याच परवानगीने रविवारी १० ते १५ जणांचा ग्रुप कांताई बंधाऱ्याजवळील नागाई-जोगाई मंदिराजवळील गिरणा नदीपात्रावर पिकनिकला आले होते. या वेळी खडकावर उभे राहून योगिता दामू पाटील (२०) व समीक्षा विपिन शिरोडकर (१८) फोटोसेशन करीत होत्या. सेल्फी घेत असताना दोघी पाण्याच्या प्रवाहात कोसळल्या. त्यांना वाचविण्यासाठी योगिताचा लहान भाऊ सागर व सोबतच्या इतरांसह नयन योगेश निंबाळकर यांनी उड्या घेतल्या. योगिता व समीक्षा यांना बाहेर काढल्यावर सागरलाही वाचविण्यात आले. मात्र, नयन निंबाळकर पाण्याच्या प्रवाहात ओढला गेल्याने तो वाहून गेला. नयनचे वडील दूध फेडरेशन येथे नोकरीला असून, आई गृहिणी आहे.

drowning death latest marathi news
माय-लेकाच्या भांडणात मध्यस्थ पडली महागात; डोक्यात हाणली काठी

पालक, पोलिसांची धाव
घडल्या प्रकाराची माहिती या मुलांसोबतच्या मित्रांनी त्यांच्या घरी कळविल्यावर पालकांसह तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. समीक्षा, योगिता व सागर या तिघांना तातडीने जिल्‍हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघी मुलींची प्रकृती धोक्याबाहेर असून, सागरही रात्रीपर्यंत नॉर्मल होईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

घटनास्थळी बचावकार्य
तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अनिल तायडे, ज्ञानेश्वर कोळी, मिथुन पाटील, भूषण सपकाळे यांच्यासह ग्रामस्थ, पट्टीच्या पोहणाऱ्यांना मदत कार्यात लावण्यात आले असून, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकासह अग्निशामक दलाचे पथक पोचले आहे. बेपत्ता युवकाचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

drowning death latest marathi news
संतापजनक! महिलेच्या घरात घुसून केला तिचा विनयभंग

जलाशयांवर हवेत सुरक्षारक्षक
चार मुले पाण्यात वाहून गेल्याची माहिती कळताच स्थानिक आमदार राजूमामा भोळे यांनी तत्काळ रुग्णालय गाठून बचावलेल्या तिन्ही मुलांची भेट घेत माहिती जाणून घेतली. त्यांच्या पालकांना धीर दिला. घडल्या प्रकाराबाबत जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी बोलणे करून जळगाव शहरालगत असलेल्या जलाशय आणि नद्या आणि पर्यटनस्थळावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाला सूचित करण्यात आले आहे, असे आमदार भोळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com