बजरंग बोगद्याचा तुटून पडलेला क्रॉस बार | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बजरंग बोगद्याचा तुटून पडलेला क्रॉस बार
बजरंग बोगदा फोटो

जळगाव : बजरंग बोगद्याचा तुटून पडलेला क्रॉस बार

जळगाव : उभारणीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या बजरंग बोगद्याच्या एका बाजूने असलेला लोखंडी क्रॉस बार गुरुवारी (ता. १८) रात्री तुटला. एखाद्या अवजड वाहनाच्या धडकेने तो तुटल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बार तुटल्यानंतर तेथून जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या वाहनावर तो आदळला, सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेच्या निमित्ताने बजरंग बोगद्याचे काम किती निकृष्ट दर्जाचे व तांत्रिकदृष्ट्या सदोष आहे, याचा प्रत्यय आला. मुंबई रेल्वेलाइनवर भोईटेनगर पिंप्राळा रेल्वेगेटच्या पुढे बजरंग बोगदा हा भुयारी मार्ग आहे. बोगद्यात साचणाऱ्या पाण्याची कायमस्वरुपी समस्या लक्षात घेता दोन वर्षांपूर्वी याठिकाणी समांतर बोगदा तयार करण्यात आला. मोठी व अवजड वाहने जाऊ नये म्हणून दोन्ही बाजूला मजबूत लोखंडी क्रॉस बारही लावण्यात आले.

हेही वाचा: एसटी संप : एक भयाण वास्तव

काम पूर्णत: सदोष पाणी साचत असल्याने दोन्हीकडील वाहतूक ठप्प व्हायची म्हणून हा समांतर बोगदा करण्यात आला खरा; मात्र, मूळ समस्या काही मिटली नाही. समांतर बोगद्यातही किरकोळ पावसाने प्रचंड पाणी साचते व वाहतूक बंद होते. गुरुवारी रात्री शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतरही बोगदा पाण्याने भरला. क्रॉस बार तुटला गुरुवारच्याच रात्री या बोगद्याच्या एका बाजूकडील क्रॉस बार तुटून खाली पडला. इतका मजबूत क्रॉस बार तुटला कसा? हा प्रश्‍नच आहे. एखाद्या अवजड वाहनाच्या धडकेने तो तुटल्याचे मानले जात आहे. तुटल्यानंतर तो दुचाकीस्वारावर पडला. सुदैवाने त्याचे प्राण वाचले. इतर वाहनधारकांनी या दुचाकीस्वाराची मदत करुन त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

loading image
go to top