Jalgaon : पाचोरा येथे घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Robbery at pachora

Jalgaon : पाचोरा येथे घरफोडी

पाचोरा (जि. जळगाव) : येथील भडगाव रोड भागातील राजराजेश्वरी कॉलनीतील पंकज पाटील यांच्या घराचा मागील दरवाजा उघडून चोरट्यांनी (thieves) अडीच लाख रुपये किमतीचे दागिने (jewelry) लांबवले. पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. (Burglary at Pachora Jalgaon Crime News)

हेही वाचा: Jalgaon : रस्त्यात जबरी लूट करणारे तिघे जेरबंद

पंकज पाटील व त्यांचे कुटुंबीय घरात झोपले असताना चोरट्यांनी मागच्या दारास ड्रिलने होल पाडून अलगद कडी उघडून घरात प्रवेश केला व घरातील कपाटात ठेवलेले अडीच तोळे सोन्याचे दागिने व पर्समधील पाचशे रुपये रोख असा ऐवज लांबवला. पोलिसांनी श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पोलिस निरीक्षक किसनराव नजन-पाटील, उपनिरीक्षक योगेश गनगे, सहाय्यक फौजदार रामदास चौधरी यांनी पाहणी करून चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

हेही वाचा: गौण खनिज उत्खननाकडे तहसीलदारांचे दुर्लक्ष

Web Title: Burglary At Pachora Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..