Jalgaon Crime : 3 मिनिटांत घरफोडी अन्‌ संशयित विमानाने फुर्रऽऽ | latest Marathi Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Burglary latest crime news

Jalgaon Crime : 3 मिनिटांत घरफोडी अन्‌ संशयित विमानाने फुर्रऽऽ

जळगाव : रहिवासी परिसरात भरदिवसा घरफोड्या (Burglary) करून मिळालेल्या रकमेने लागलीच मुंबई व तेथून विमानाने विविध राज्यांत पलायन करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जिम्मी उर्फ दीपक विपिन शर्मा (वय २९, रा. गुरुकुलनगर नंदुरबार) असे अटक करण्यात आलेल्या घरफोड्या आरोपीचे नाव आहे. (Burglary in 3 minutes and suspect flew by plane jalgaon latest Crime News)

दिवसा घरफोडी करून लागलीच विमानाने पलायन करण्याची जिम्मीची गुन्हे करण्याची पद्धत आहे. चोपडा व अमळनेर या दोन्ही शहरांत (ता. ३० जून) मोठ्या घरफोड्या झाल्या होत्या. या घरफोड्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेढे, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, परेश महाजन, मुरलीधर बारी यांची टीम या घरफोड्यांच्या गुन्ह्यांच्या तपासावर होती. दोन्ही ठिकाणच्या गुन्ह्यात असलेली साम्यता आणि अवघ्या तीन ते चार मिनिटांत काम करून चोरटा पसार झाल्याची सारखी पद्धत पाहता पोलिस पथकाने तांत्रिक माहिती संकलित करण्यास सुरवात केली. त्यावरुन जिम्मी शर्मा नंदुरबार पोलिसांच्या वाँटेड लिस्‍टमधील संशयित असल्याची माहिती समोर आली.

अटकेनंतर उलगडा
गुप्त माहितीच्या आधारे सलग तीस दिवस संशयिताचा पिच्छा पुरविल्यावर अट्टल गुन्हेगार जिम्मी शर्मा (रा. नंदुरबार) याला पकडण्यात यश आले. पोलिसीखाक्या दाखविल्यानंतर त्याने चोपडा व अमळनेर येथील घरफोड्या केल्याचे कबूल केले आहे. चोपडा शहरातील दोन व अमळनेर येथील एक, असे घरफोडीचे तीन गुन्हे कबूल केले आहे. त्याच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा: जळगाव : मन्यारखेड्यात घरफोडी 64 हजारांची रोकड लंपास

तीन मिनिटांत एक घरफोडी
बंदघराची रेकी केल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत जिम्मी घर फोडून आतील रोकड, दागिने शेाधून काढतो. त्याच्या खास शैलीत फक्त रोकड आणि दागिन्यांच्या जागेवरील साहित्य अस्ताव्यस्त करून तो पुढच्या तीन मिनिटांत घराबाहेर पडतो. त्यानंतर गाव तालुक्यातून मुंबई-औरंगाबाद गाठत नंतर चक्क विमानाने दिल्ली, हरियाना, राजस्थान, गुजरात असा पळ काढत असल्याचे त्याने पोलिसांना दाखविलेल्या प्रात्यक्षिकात कबूल केले आहे. त्याच्यावर विविध राज्यांत सुमारे तीस ते चाळीस मोठे घरफोड्यांचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा: जळगाव : मन्यारखेड्यात घरफोडी 64 हजारांची रोकड लंपास

Web Title: Burglary In 3 Minutes And Suspect Flew By Plane Jalgaon Latest Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..