जळगाव : मन्यारखेड्यात घरफोडी 64 हजारांची रोकड लंपास

याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Murder in Visapur was for purpose of theft
Murder in Visapur was for purpose of theftSakal
Updated on

जळगाव : जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा येथे मध्यरात्री घरातून चोरट्यांनी लोखंडी कपाट फोडून ६४ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Murder in Visapur was for purpose of theft
तोंडावर बिअरबॉटल फोडत प्राणघातक हल्ला करणारी टोळी गजाआड

मन्यारखेडा (ता. जळगाव) येथील रामदेव मकरध्वज कुशवा (वय ४३) आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. ६ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजता कुटुंबीयांसह रात्री झोपले. मध्यरात्री त्यांनी घराचा दरवाजा उघडा ठेवला होता. याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात शिरून घरातील लोखंडी कपाटातून ६४ हजार रूपयांची रोकड लांबविली. हा प्रकार गुरूवारी (ता. ७) सकाळी उघडकीला आला. रामदेव कुशवा यांनी शनिवारी (ता. ९) नशिराबाद पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरोधात नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र तायडे करीत आहे.

Murder in Visapur was for purpose of theft
Latest marathi news | चाकूचा धाक दाखवत तरुणाला लुटले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com