
Jalgaon Crime : चोपड्यात घरफोडी; सोन्यासह रोकड लंपास
चोपडा (जि. जळगाव) : शहरातील त्र्यंबकनगर व सहकार कॉलनी या दोन ठिकाणी भर दिवसा चोरट्यांनी (Thieves) बंद घरे फोडली (Burglary) असून दोन्ही घरातून १२ तोळे सोने (Gold) व अडीच लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. (burglary in Chopda Cash stolen with gold jalgaon crime news)
हेही वाचा: एका नाथाच्या बंडाने दुसऱ्या नाथाच्या स्वप्नांवर फिरले पाणी
सविस्तर वृत्त असे, की त्र्यंबकनगर भागातील रहिवासी संतोष सोनवणे यांच्या घरात दुपारी १ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करून तब्बल ५ तोळे सोने व ८० हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. त्यांनी नुकतेच सोसायटीच्या माध्यमातून दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. दोन वाजेच्या सुमारास सहकार कॉलनीतील रहिवासी कैलास रामदास वाघ यांच्या बंद घराचे कुलूप तोडून तसेच कपाटातील ७ तोळे सोने व १ लाख ७५ हजार रुपयांची रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. एकाच दिवशी भर दिवसा दोन घरफोड्या झाल्याने पोलिसांपुढे चोर पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सदर घटनास्थळी श्वान पथकास खास पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांनी हजेरी लावून काही सुगावा मिळतोय काय याची तपासणी केली. सदर घटनेचा अधिक तपास चोपडा शहर पोलिस करीत आहेत.
हेही वाचा: हिंगोणा येक्षील पाणी समस्या कायमची मिटणार
Web Title: Burglary In Chopda Cash Stolen With Gold Jalgaon Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..