Latest Marathi News | जळगाव : पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळ बसचालकाला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime Latest Marathi News

जळगाव : पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळ बसचालकाला मारहाण

जळगाव : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी (ता. १४) रस्ता वन-वे केला होता. या गर्दीतून बसस्थानकात शिरणाऱ्या बसवरील चालकाला दुचाकीस्वारांनी बेदम मारहाण केली. (Latest Marathi News)

रविवारी सायंकाळी शहरात विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शहरातून सायंकाळी रॅली काढली होती. परिणामी, रेल्वेस्थानक ते महाबळ रोड वन-वे करण्यात आला होता. महाभव्य रॅली पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून जात असताना, राज्य परिवहन महामंडळाचे चालक नरेंद्र दिनकर पाटील (वय ३५, रा. निवृत्तीनगर) त्यांच्या ताब्यातील ठाणे-जळगाव बस (एमएच २०, डीएल ४०९५) घेऊन जळगावी परले होते.

हेही वाचा: जळगाव : शिवाजीनगरात रस्त्यातील व्हॉल्व्हमुळे नागरिकांचा जीव धोक्यात

बसस्थानकात शिरण्यापूर्वीच राममंदिराजवळ दुचाकीवरील कुणाल महेश कोळंबे (रा. केमिस्ट भवनसमोर, जळगाव), मोहित रमेशलाल काटपाल (रा. नेत्रज्योती हॉस्पिटलसमोर, जळगाव) यांच्यासह दोन जणांनी बस अंगावर आणतो का, असे म्हणत बसचालक नरेंद्र पाटील यांना शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नाही, तर त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत बसचालक नरेंद्र दिनकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुणाल कोळंबे, महेश काटपाल यांच्यासह आणखी दोन जणांविरोधात जिल्हापेठ पोलिसांत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार तपास करीत आहेत.

हेही वाचा: जळगाव : वरणगाव आयुध निर्माणीतील वरिष्ठ अधिकाऱ्यावर हल्ला

Web Title: Bus Driver Beaten Up Near Jalgaon Superintendent Of Police Office Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaonst busbus Driver