
Jalgaon Crime News: व्यापारी महिलेची फसवणूक
जळगाव : व्यापारी महिलेचा विश्वास संपादन करून ९ लाख ७९ हजारांत फसवणूक केली. न्यायालयाच्या आदेशावरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अशोकनगरातील मनीषा नंदकिशोर सोमाणी धान्य मार्केटमध्ये कडधान्य विक्री करतात. त्यांच्याकडून सीताराम घिसूलाल उपाध्याय (प्रो. विठ्ठल ट्रेडर्स, रा. दालफळ) यांनी वेळोवेळी माल घेऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून ९ लाख ७९ हजार १६९ रुपयांचा माल वेळोवेळी उधारीने खरेदी केला.
हेही वाचा: अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम
उपाध्याय यांच्याकडे मालाचे पैसे मागितले असता, त्यांनी पैसे न देता तुम्हाला मार्केटमध्ये व्यवसाय करू देणार नाही, अशी धमकी दिली व सवणुक केली. याबाबत न्यायालयात खटला दाखल केला होता.
न्यायालयाने एमआयडीसी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महिलेच्या तक्रारीवरून सीताराम उपाध्याय याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे तपास करीत आहेत.